महत्वाच्या बातम्या

 अर्शदीपने स्टंप तोडताच फ्रेंचायजीची तक्रार : मुंबई पोलिसांनी दिला भन्नाट रिप्लाय


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : शनिवारी मुंबईतील वानखेडे मैदानावर रोमहर्षक सामना पार पडला. मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानावर पंजाब किंग्जकडून १३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पंजाबचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने अखेरच्या षटकामध्ये टिच्चून गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. अखेरच्या षटकात मुंबईला १६ धावांची गरज होती. मात्र अर्शदीपने फक्त दोन धावा देत मुंबईच्या दोन विकेट्स काढल्या.

संपूर्ण लढतीत चार बळी घेणाऱ्या अर्शदीपने अखेरच्या षटकामध्ये दोनदा स्टंप तोडल्याने त्याच्या गोलंदाजी सोशल मीडियावर चर्चा आहे. पंजाब किंग्जनेही आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक मजेशीर ट्विट केले आहे. यात अर्शदीपने तोडलेल्या स्टंपचा फोटो पोस्ट केला असून आम्हाला गुन्हा नोंदवायचा आहे, असे कॅप्शन देण्यात आले आहे. मुंबई पोलिसांना टॅग करून हे ट्विट करण्यात आले आहे.

पंजाब किंग्जच्या या द्विटची मुंबई पोलिसांनीही दखल घेतली आहे. मुंबई पोलिसांनी पंजाब किंग्जला भन्नाट रिप्याल दिला असून याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता असते, स्टंप मोडणाऱ्यांवर नाही, असा रिप्लाय मुंबई पोलिसांनी दिला आहे.

अर्शदीपची स्टंपतोड गोलंदाजी

मुंबईला शेवटच्या दोन षटकांत ३१ धावांची गरज होती. १९ व्या षटकात १५ धावा झाल्या आणि विजयासाठी शेवटच्या षटकात १६ धावा करायच्या होत्या. पण अर्शदीपने शेवटच्या षटकात दोन बळी घेत केवळ दोन धावा दिल्या आणि पंजाब संघ १३ धावांनी विजयी झाला. या षटकात तिसऱ्या चेंडूवर त्याने तिलक वर्माचा, तर चौथ्या चेंडूवर इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आलेल्या नेहाल वढेरा याचा बोल्ड काढला. विशेष म्हणजे दोन्ही वेळेस स्टंप मधून तुटला.

स्टंपची किंमत किती ?

दरम्यान, आयपीएलमध्ये लावण्यात येणाऱ्या एलईडी स्टंपच्या सेटची किंमत साधारण ३० लाख असते. अर्शदीपने दोनदा स्टंप तोडल्याने आयपीएल आयोजकांना ६० लाखांचा फटका बसला.





  Print






News - Rajy




Related Photos