पंचतारांकित रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये पोलिसांची धाड : दलाल महिलेला अटक , पीडित तरुणीची सुटका


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : 
वर्धा मार्गावर असलेल्या  पंचतारांकित  रेडिसन ब्ल्यू   हॉटेलमध्ये नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी रात्री छापा टाकला. यावेळी एका दलाल महिलेला अटक करण्यात आली आहे.  तर एका पीडित तरुणीची सुटका करण्यात आली आहे.  पूजा रॉय असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. 
 पूजा रॉय  ही  महिला तरुणींना देहव्यापार करायला भाग पाडते, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. उपायुक्त संभाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी सोमवारी रात्री सापळा रचला. पोलिसांनी एका खबरीला पूजा रॉयशी संपर्क साधायला लावला. खबरीने ग्राहक असल्याचे भासवत तिच्याशी संपर्क साधला. त्या महिला दलालाने खबरीला एका तरुणीचे फोटो पाठवले. तासाला १० हजार रुपये आकारले जातील, असे तिने खबरीला सांगितले. खबरीने महिलेला तरुणीसह रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये यायला सांगितले. ठरल्यानुसार सोमवारी रात्री महिला आणि तरुणी हॉटेलमध्ये येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पीडित तरुणीची सुटका करण्यात आली असून ती मूळची कोलकाता येथील आहे.    Print


News - Nagpur | Posted : 2019-01-08


Related Photos