महत्वाच्या बातम्या

 महाराजस्व अभियान सामान्य जनतेच्या हिताचे : जि.प. माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम


- पिरमीडा येथे महाराजस्व अभियान संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिरोंचा : शासन आपल्या दारापर्यंत पोहोचून विविध योजनांचा लाभ महाराजास्व अभियानातून दिल्या जात आहे. हे अभियान सामान्य जनतेच्या हिताचे असून नागरिकांनी विविध योजनाबाबत माहिती जाणून घेऊन प्रत्येक योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जि. प. माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी केले.

सिरोंचा तालुक्यातील पिरमीडा येथे तहसील कार्यालयामार्फत १८ एप्रिल ला मुख्यमंत्री शासकीय योजना गतिमान अंमलबजावणी अभियान अंतर्गत शासकीय योजनांची जत्रा, महाराजस्व अभियान कार्यक्रम घेण्यात आले. या अभियानाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून येथील तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी अनिल कुमार पटले, नायब तहसीलदार मांडवगडे, नायब तहसीलदार तोटवार, तालुका कृषी अधिकारी दोंदे, गटशिक्षणाधिकारी शेंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी झाडे, विशेष अतिथी म्हणून पंचायत समितीचे माजी उपसभापती सत्यनारायण परपटलावार, जि. प. माजी सदस्य मधुकर मडावी, विठ्ठलरावपेठा चे सरपंच सतीश आत्राम, मोयाबीनपेठाचे सरपंच बेबीताई कोडापे, पर्सेवाडाचे सरपंच कमला गेडाम, उपसरपंच श्रीनिवास कडार्ला, उपसरपंच शंकर वेलादी, वेंकटलक्ष्मी अरवेली आदी मान्यवर उपस्थित होते.

भाग्यश्री आत्राम पुढे बोलताना म्हणाले, महाराजास्व अभियानामुळे खेड्यापाड्यातील नागरिकांना विविध दाखल्यांची घरपोच सेवा मिळत असून याचा नक्कीच मोठ्या प्रमाणात फायदा होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. एवढेच नव्हे तर प्रशासनाने केलेल्या योग्य नियोजनामुळे शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित झाल्याने समाधानही त्यांनी व्यक्त केले.

महाराजस्व अभियानात विविध विभागाकडून मोठ्या प्रमाणात स्टॉल लावून शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. तर गरजू नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी रेगुंठा, पिरमीडा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos