महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


१९ एप्रिल महत्वाच्या घटना

१५२६ : मोगल साम्राज्याचा संस्थापक बाबर यांचा मोगलसत्तेचा पाया घातला.

१९४५ : सोविएत रशिया आणि ग्वाटेमालामधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

१९४८ : ब्रह्मदेशचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१९५६ : गीतरामायणातील शेवटचे गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले.

१९७१ : सिएरा लिओन प्रजासत्ताक बनले.

१९७५ : आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह रशियन अंतराळस्थानकावरून प्रक्षेपित करण्यात आला.

१९ एप्रिल जन्म

१८६८ : रोटरी क्लबचे संस्थापक पॉल हॅरिस यांचा जन्म. (मृत्यू: २७ जानेवारी १९४७)

१८९२ : शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑगस्ट १९७३)

१९१२ : नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ ग्लेन सीबोर्ग यांचा जन्म. (मृत्यू: २५ फेब्रुवारी १९९९)

१९३३ : ख्यातनाम क्रिकेट पंच डिकी बर्ड यांचा जन्म.

१९५७ : भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांचा जन्म.

१९७७ : भारतीय लाँग जम्पर अंजू बॉबी जॉर्ज यांचा जन्म.

१९८७ : रशियन लॉनटेनिस खेळाडू मारिया शारापोव्हा यांचा जन्म.

१९ एप्रिल मृत्यू

१८८१ : इंग्लंडचे पंतप्रधान बेंजामिन डिझरेली यांचे निधन. (जन्म: २१ डिसेंबर १८०४)

१८८२ : ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १८०९)

१९०६ : नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ पिअर क्यूरी यांचे निधन. (जन्म: १५ मे १८५९)

१९१० : क्रांतिकारक अनंत कान्हेरे यांचे निधन.

१९५५ : ब्रिटिश-भारतीय वन्यजीव तज्ज्ञ आणि लेखक जिम कॉर्बेट यांचे निधन. (जन्म: २५ जुलै १८७५)

१९७४ : फील्ड मार्शल आणि पाकिस्तानचे दुसरे राष्ट्राध्यक्ष आयुब खान यांचे निधन. (जन्म: १४ मे १९०७)

१९९३ : स्वातंत्र्यसैनिक डॉ. उत्तमराव पाटील यांचे निधन.

१९९४ : पंजाबचे माजी मंत्री मेजर जनरल राजिंदरसिंग उर्फ स्पॅरो यांचे निधन.

१९९८ : उद्योजीका सौ. विमलाबाई गरवारे यांचे निधन. (जन्म: १८ डिसेंबर १९२८)

२००३ : भारतीय-इंग्रजी खलीफा मिर्जा ताहिर अहमद यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १९२५)

२००४ : गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चे सहसंस्थापक नॉरिस मॅक्विहिर यांचे निधन.

२००८ : लेखिका, संतसाहित्याच्या अभ्यासिका व राजकारणी सरोजिनी बाबर यांचे निधन. (जन्म: ७ जानेवारी १९२०)

२००९ : मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या अहिल्या रांगणेकर यांचे निधन. (जन्म: ८ जुलै १९२२)

२०१० : लेखक आणि टीकाकार मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांचे निधन. (जन्म: ७ जून १९१३)





  Print






News - todayspecialdays




Related Photos