महत्वाच्या बातम्या

 भीम जयंती निमित्य अत्याधुनिक व्यायाम साहित्याचा लोकार्पण कार्यक्रम सोहळा आयोजित 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती  निमित्य अत्यानुधिक व्यायाम साहित्यचे लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 

यावेळी महाराष्ट्राचे वन, सांस्कृतिक व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधिर मुनगंटीवार यांच्या विशेष प्रयत्नातून वैशिष्टयपुर्ण निधी अंतर्गत प्राप्त झालेल्या अत्याधुनिक व्यायाम साहित्याच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बल्लारपूर शहरातील नालंदा क्रीडा मंडळ द्वारा संचालित संस्कार व्यायाम शाळेत डॉ. झाकीर हुसेन वार्ड, संत तुकाराम महाराज सभागृह समोर या अत्याधुनिक व्यायाम साहित्याचं लोकार्पण १४ एप्रिल २०२३ ला सायंकाळी ६:०० वाजता संपन्न होत आहे. 

सदर साहित्याचे लोकार्पण सुधिर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहेत. कार्यक्रमाचे विशेष अतिथी चंदनसिह चंदेल ज्येष्ठ भाजप नेते बल्लारपूर असणार आहेत. तरी सदर कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन, समीर केने व मनीष पांडे यांनी केल आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos