सेमिनार स्पर्धा २०२६-२७ मध्ये कॅडेट्सची दमदार कामगिरी


- उत्कृष्ट सादरीकरण, संशोधनवृत्ती व आत्मविश्वासाचे दर्शन; गुणवंत कॅडेट्सचा पारितोषिक देऊन गौरव
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गोंडवाना सैनिकी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गडचिरोली येथे सेमिनार स्पर्धा २०२६–२७ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. स्पर्धेत कॅडेट्सनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उत्कृष्ट सादरीकरण कौशल्य, शैक्षणिक तयारी, संशोधनवृत्ती, संवादकौशल्य आणि आत्मविश्वासाचे प्रभावी दर्शन घडविले.
विद्यार्थ्यांच्या संवादकौशल्य, संशोधन क्षमता आणि नेतृत्वगुणांना चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत कॅडेट्सना आपल्या विषयाचा सखोल अभ्यास करून तो प्रभावीपणे मांडण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे स्पर्धेला उत्साहपूर्ण वातावरण प्राप्त झाले.
स्पर्धेत बेस्ट नोट्स प्रेझेंटेशन पुरस्कार कॅडेट ईशांत बोगा यांना, तर बेस्ट प्रेझेंटेशन असिस्टंट पुरस्कार कॅडेट अथर्व कटकमवार यांना प्रदान करण्यात आला. उत्तेजनार्थ पारितोषिक कॅडेट अनुष गजभिये यांना देण्यात आले. तृतीय क्रमांक कॅडेट वैभव पिपरे व कॅडेट प्रणित यांनी, द्वितीय क्रमांक कॅडेट नरेंद्र नखाते यांनी, तर प्रथम क्रमांक कॅडेट क्रुतांत गोमासे यांनी पटकावला.
स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासह उत्तेजनार्थ व विशेष पुरस्कार प्राप्त कॅडेट्सना विद्यालयाचे प्राचार्य मा. ओमप्रकाश संग्रामे सर, पर्यवेक्षक अजय वानखेडे सर व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करून गौरविण्यात आले. यावेळी सर्व विजेत्या व सहभागी कॅडेट्सचे त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदन करण्यात आले.
विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, समर्पण आणि उत्कृष्ट तयारी यामुळे स्पर्धेला विशेष यश प्राप्त झाले. या स्पर्धेमुळे कॅडेट्समध्ये अभ्यासाची आवड, संशोधनवृत्ती, प्रभावी संवाद आणि नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत झाली. यश म्हणजे केवळ जिंकणे नव्हे तर शिकणे, विकसित होणे आणि आपले सर्वोत्तम देणे होय. या प्रेरणादायी विचारातून विद्यार्थ्यांना भविष्यातही उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा देण्यात आली.




Petrol Price




