महत्वाच्या बातम्या

 हनुमान जन्मोत्सव निमित्य स्वयं रक्तदाता जिल्हा समिती अंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / आरमोरी :  स्वयं रक्तदाता जिल्हा समिती अंतर्गत हनुमान जन्मोत्सव निमित्य आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सदर समिती अंतर्गत रक्तदानाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करून नागरिकांना रक्तदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहित करून रक्तपेढीमध्ये रक्ताची टंचाई भासू नये, म्हणून स्वयं रक्तदाता समिती वेळोवेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करत असते.

यावेळी गुरुदेव बागमारे, प्रज्वल नारदेलवार, भास्कर खरकाटे, राकेश नारदेलवार, राकेश ढोरे, आकाश राऊत, नितीन ढोरे, उत्तम चौधरी, लोचन ढोरे, अनिकेत बरडे, विकास पायदलवार, हरीचंद राऊत, हरिराम सहारे, राम बांडे, श्रीकृष्ण उईके, नितेश धोटे, सौरव शास्त्राकर, अनुराग ढोरे, राजू कुत्तीरमारे, वैभव धोटे, प्रकाश ढोरे, संघर्ष सामृतवार, अभिषेक राऊत, अरुण राऊत असे एकुण २४ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासून समाजाला रक्ताची देणगी दिले.

सदर रक्तदान शिबिर समितीचे उपाध्यक्ष निशिकांत नैताम, कोषाध्यक्ष आकाश आंबोरकर, भास्कर खरकाटे, राकेश नारदेलवार व हर्षु राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. रक्त संकलनासाठी जिल्हा रक्तपेढी येथील चमू उपस्थित होते.

रक्तदान ही एक देणगी आहे. म्हणून सर्वांनी रक्तदान करून समाजाला देणगी दिली पाहिजेत - आकाश पि. आंबोरकर





  Print






News - Gadchiroli




Related Photos