गडचांदूर येथे खालसा हेल्प फाउंडेशनतर्फे प्रथम प्रकाश गुरुपर्व सोहळा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : खालसा हेल्प फाउंडेशन, गडचांदूरच्या वतीने गुरु ग्रंथ साहेबजी यांच्या प्रथम प्रकाश गुरुपर्वानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा सोहळा ११ सप्टेंबर रोजी गुरुद्वारा साध संगत, गडचांदूर येथे पार पडला. खालसा हेल्प फाउंडेशनने कार्यक्रमासाठी आमचे मार्गदर्शक – आमची ताकद ही संकल्पना मांडली. या माध्यमातून संस्थेच्या सामाजिक व सेवाभावी कार्याला दिशा देणाऱ्या ज्येष्ठ मार्गदर्शकांचा गौरव करण्यात आला. हरिश्चंद्र अरोरा, पृथ्वीराज खुराना, विश्वंभर झाम, एस. रामसिंग भुरानी आणि हंसराज चौधरी यांचा विशेष उल्लेख करण्यात आला.
कार्यक्रमाला खालसा हेल्प फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष तेजिंदरसिंग दारी, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अर्जुनसिंग धुन्ना, चंद्रपूर शहर अध्यक्ष पूरनसिंग जुनेजा, जिल्हा युवा अध्यक्ष गुरजितसिंग गढोक आणि विदर्भ अध्यक्ष बलबीरसिंग गुरोन यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी खालसा हेल्प फाउंडेशन ची नविन शाखेचे स्थापना करण्यात आली. त्यात कार्याध्यक्ष गोपालसिंग सचदेव, सचिव सतनामसिंग भुरानी, संयुक्त सचिव पवनसिंग बावरी, प्रकल्प संचालक इशांत चौधरी, प्रकल्प समन्वयक हरिओम अरोरा, प्रकल्प प्रभारी गिरीश खुराना, सोनू झाम, मंगलसिंग हजरा, इंदरजीतसिंग कश्यप, जोगिंदरसिंग, परविंदरसिंग बावरी, किरतसिंग भुरानी आदी पदाधिकारी ची नियुक्ती करण्यात आले. गुरुपर्वानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून सेवा, एकोपा आणि मानवतावादी मूल्यांचा संदेश देण्यात आला.




Petrol Price




