महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


५ एप्रिल महत्वाच्या घटना 

१६६३ : दहा हजार फौजेसह पुण्याच्या लाल महालात तळ देऊन राहिलेला मोगल सुभेदार शाहिस्तेखान याच्यावर शिवाजी महाराजांनी दोनशे स्वारांसह अकस्मात छापा घातला. शाहिस्तेखान खिडकीतून पळून गेल्याने बचावला; मात्र पळुन जाण्याच्या प्रयत्नात त्याची तीन बोटे तुटली. 

१६७९ : राजारामास पकडण्यासाठी झुल्फिकारखानाने रायगडास वेढा दिला असता राजाराम रायगडावरून प्रतापगडास गेला. पुढे प्रतापगडासही शत्रूने वेढा दिल्यावर राजारामास पन्हाळगडावर जावे लागले.

१९५७ : कम्युनिस्ट पक्षाने भारतात प्रथमच केरळमध्ये निवडणूका जिंकल्या आणि इ. एम. एस. नंबुद्रीपाद हे केरळचे मुख्यमंत्री झाले.

२००० : अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते डी. डी. १० या मराठी उपग्रह वाहिनीचे सह्याद्री असे नामकरण करण्यात आले.

२००० : जळगाव नगरपालिकेच्या १७ माजली इमारतीचे उद्घाटन.

१९९९ : राष्ट्रीय समुद्री दिवस भारताच्या मालकीचं पहिलं जहाज एस.एस. लॉयल्टी लंडनला रवाना झालं.

५ एप्रिल जन्म

१८२७ : निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बया होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद सर जोसेफ लिस्टर यांचा जन्म. (मृत्यू : १० फेब्रुवारी १९१२)

१८५६ : अमेरिकन निग्रोंच्या प्रश्नासाठी कार्य करणारे समाजसेवक, लेखक, वक्ते व शिक्षणतज्ञ बुकर टी. वॉशिंग्टन यांचा जन्म. (मृत्यू : १४ नोव्हेंबर १९१५)

१९०८ : स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकारणी, केंद्रीय मंत्री व भारताचे उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम यांचा जन्म. (मृत्यू : ६ जुलै १९८६)

१९०९ : जेम्स बाँड चित्रपटांचे निमति अल्बर्ट आर. ब्रोकोली यांचा जन्म. (मृत्यू : २७ जून १९९६)

१९१६ : हॉलीवूड अभिनेता ग्रेगरी पेक यांचा जन्म. (मृत्यू : १२ जून २००३) 

१९२० : महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री आणि लोकसभा सदस्य डॉ. रफिक झकारिया यांचा जन्म. (मृत्यू : ९ जुलै २००५)

१९२० : इंग्लिश कादंबरीकार आर्थट हॅले यांचा जन्म. (मृत्यू : २४ नोव्हेंबर २००४)

१९६६ : भारतीय-अमेरिकन अभिनेते आणि निर्माते आसिफ मांडवी यांचा जन्म.

५ एप्रिल मृत्यू

१९७१ : स्वातंत्र्यशाहीर शंकरराव निकम यांचे निधन.

१९२२ : आर्य महिला समाजच्या संस्थापिका पंडिता रमाबाई यांचे निधन. (जन्म : २३ एप्रिल १८५८)

१९४० : इंग्लिश मिशनरी, महात्मा गांधींचे जवळचे मित्र, समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते चार्लस फिअरी तथा दीनबंधू अँन्ड्यून यांचे निधन. (जन्म : १२ फेब्रुवारी १८७१)

१९६४ : नकलाकार गोपाळ विनायक भोंडे यांचे निधन..

१९९३ : हिंदी, तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री दिव्या भारती यांचे निधन. (जन्म : २५ फेब्रुवारी १९७४)

१९९६ : बालगंधर्वांना पंधरा वर्षे साथ करणारे ऑर्गनवादक भालचंद्र नीळकंठ तथा बाबा पटवर्धन यांचे निधन.

१९९८ : चित्रपट व नाट्य अभिनेत्री रूही बेर्डे यांचे निधन.

२००२ : दुबईस्थित वादग्रस्त भारतीय उद्योगपती, जम्बो ग्रुपचे संचालक मनोहर राजाराम तथा मनू छाबरिया यांचे निधन.





  Print






News - todayspecialdays




Related Photos