महत्वाच्या बातम्या

 खून खटल्यात दोषी तरुणाला लग्नासाठी पॅरोल मंजूर : याच तरुणाशी लग्न करण्याचा होता युवतीचा हट्ट


विदर्भ न्यूज एक्सपेस 
वृत्तसंस्था / कर्नाटक : एका तरूणीने प्रियकराला पॅरोल मंजूर झाला नाही तर मला कोणी अन्य व्यक्ती घेऊन जाईल असे सांगत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तरूणीचा प्रियकर हत्ये प्रकरणात तुरूंगात शिक्षा भोगत आहे. त्याला लग्नासाठी 15 दिवसांचा पॅरोल मंजुर व्हावा यासाठी तिने कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी झाली असून न्यायालयाने तरूणाचा पॅरोल मंजूर केला आहे.

नीथा नावाच्या तरूणीने कर्नाटक उच्च न्यायालयात आपल्या होणाऱ्या सासूसोबत याचिका दाखल केली आहे. तिच्या म्हणण्यानुसार ती गॅरेंटी देते की पॅरोल दरम्यान तिचा प्रियकर आनंद असा कुठलाच प्रकार करणार नाही ज्याने कायदा आणि पोलीसांच्या कामात अडथळा येईल. याचबरोबर याचिकेत आनंदच्या आईचाही समावेश होता. तिचे वय झाले असून तिच्याकडे फार कमी दिवस शिल्लक आहेत असे तिने कोर्टात केलेल्या अर्जात म्हटले आहे. पण जिवंत असताना तिला आनंद आणि नीथा या दोघांचे लग्न पाहण्याचे स्वप्न आहे. त्या दोघांचे अनेक वर्ष एकमेकांवर प्रेम असून दोघंही एकमेकांशिवाय राहू शकत नाही असेही त्यात म्हटले आहे.

न्यायाधिश एम. नागप्रसन्ना आधी दोघांची याचिका पाहून प्रश्न पडला. मात्र सुनावणी दरम्यान केलेल्या युक्तीवादा नंतर न्यायाधिशांनी विचार केला. त्यांनी निथा आणि तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या आनंदच्या आईची याचिका मंजूर केली. त्यांनी दोघांनाही तुरुंग अधिकाऱ्यांसमोर अर्ज सादर करण्याचे आदेश दिले. न्यायालयाने तुरूंग अधिकाऱ्यांना आदेश दिला की, तो कमीत कमी 15 दिवसांसाठी आनंदला पॅरोलवर सोडण्यात यावे. ज्यामुळे तो नीथाशी लग्न करू शकेल. आनंद हत्या प्रकरणी दोषी आढळला आहे. तो सध्या कैदी नंबर 11699 कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याला 5 एप्रिलच्या दुपार पासून 20 एप्रिलच्या संध्याकाळ पर्यंत पॅरोलवर सोडण्याचा आदेश दिला आहे. यावेळी न्यायालयाने बाहेर कोणतही अस काम करू नको ज्यामुळे तुझ्या अडचणीत वाढ होईल असे कठोरपणे सांगितले आहे.

दरम्यान सरकारी वकिलाने नीथा आणि तिची सासू यांच्या याचिकेला विरोध केला आहे. आनंद एका हत्येच्या गुन्ह्यात दोषी आढळला आहे. त्याला लग्नासाठी पॅरोलवर सोडणे चुकीचे आहे. कायद्यात असे कुठेच नाहीय की एखाद्या आरोपीला लग्नासाठी पॅरोलवर सोडण्यात यावे. त्यांचे म्हणणे होते की, हत्येत दोषी आढळलेल्या व्यक्तीला कोणाच्या लग्नात सहभागी व्हायचे असते तर ती वेगळी गोष्ट आहे. मात्र अशा प्रकारची याचिका मानण्यात ते तयार नाहीत. मात्र कर्नाटक उच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालय आणि राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देत आनंदला पॅरोलवर सोडण्यात यावे असा आदेश दिला आहे.





  Print






News - Rajy




Related Photos