महत्वाच्या बातम्या

 जिल्हास्तरीय युवा पुरस्कार सन २०२१-२२ करिता प्रस्ताव आमंत्रित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत राज्याचे युवा धोरण २०१२ अन्वये १२ नोव्हेंबर २०१३ च्या शासन निर्णयानुसार, जिल्ह्यातील युवांनी व संस्थांनी केलेल्या समाज हिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवांना विकासाचे कार्यकरण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कार प्रती वर्षी देण्यात येत असतो.

सदर पुरस्कार जिल्ह्यातील एक युवक, एक युवती व एक नोंदणीकृत संस्थां यांना देण्यात येते. त्याअनुषंगाने सदर पुरस्काराकरीता कार्यालयाच्यावतीने वृत्तपत्रीय प्रसिद्दीद्वारे प्रस्ताव मागविण्यात येत आहे. तरी खालील प्रमाणे मुल्यांकनासह व पात्रतेचे निकष पुर्ण करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील युवक, युवती व संस्थांनी या कार्यालयातुन अर्ज प्राप्त करुन घेऊन, आवश्यक कागदपत्र व शासन निर्णयानुसार पात्रतेच्या निकषाचे पुरावे व मुल्यांकनाच्या पुराव्याचे संपूर्ण कागदपत्रासह तसेच युवक-युवतीचे पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र व संस्थेसाठी प्रस्ताव सादर करणाऱ्यांनी सर्व सदस्यांचे पोलीस चारित्र्य प्रमाणपत्रासह आपला परिपुर्ण प्रस्ताव १२ एप्रिल २०२३ पर्यंत दोन प्रतीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, गडचिरोली येथे सादर करावा. तसेच अधिक माहिती करीता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा १२ नोव्हेंबर २०१३ रोजीचा शासन निर्णयाचे अवलोकन करावे. अधिक माहिती करीता कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष कार्यालयात संपर्क साधावा, असे प्रशांत दोंदल, जिल्हा क्रीडा अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos