उभ्या असलेल्या ट्रकच्या केबीन मध्ये संशयास्पद अवस्थेत आढळला चालकाचा मृतदेह


- खुन झाल्याचा संशय
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज  :
आरमोरी मार्गावरील वखार महामंडळाच्या बाजूला दोन दिवसा पासून बंद अवस्थेत उभ्या असलेल्या ट्रकच्या केबीन मध्ये कुजलेल्या अवस्थेत ट्रक चालकाचा मृतदेह आढळला. त्यामुळे खळबळ उडाली आहे. अधिक तपास  देसाईगंज  पोलिस करीत आहेत.
 मागील दोन- तिन दिवसा पासून आरमोरी मार्गावरील वखार महामंडळाच्या बाजूला लोखंडी सळाख भरलेला ट्रक क्र.एम.एच ४० एन ६७९३   उभा होता. ट्रक लोखंडी सळाख भरून छत्तीसगढ राज्यातील रायपूर वरून गोंदिया करीता चालक नईम शेख  (५०) निघाला. गोंदिया येथे गाडी खाली करून तेथून निघत असल्याचे त्याने १५ डिसेंबला रात्री ८.३०  वाजता घरी फोन करून सांगितले. मात्र त्यानंतर त्याचा घरी कोणताही संपर्क झाला नाही.  १७ डिसेंबरला रात्री १२ वाजताच्या दरम्यान आरमोरी मार्गावर वखार महामंडळाच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रक मधून दुर्गध येत असल्याची  पोलिसांना माहिती  मिळाली. तपास केला असता ट्रकच्या केबीन मध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. त्याची ओळख पटली असून तो नईम शेख असल्याचे स्पष्ट झाले व तो गोंदिया जिल्हयातील देवरी येथील रहीवासी असल्याचे समजते. ट्रक मधुन जवळपास १ टन लोखंडी सळाख कमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मृतकाच्या मुलांनी वडील बेपत्ता असल्या पासून व्हाटॅसअॅप व्दारे वडीलांचा शोध लावण्याचा प्रयत्न चालविला होता. त्यामुळे मृतकाची ओळख पटविणे सोपे झाले. अधिक तपास देसाईगंजचे पोलिस निरीक्षक सिध्दांनद मांडवकर करीत आहेत.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-19


Related Photos