महत्वाच्या बातम्या

 खासगी ट्रॅव्हल्सचा देखील महिला प्रवाश्यांना ५० टक्के सूट देण्याचा निर्णय


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : एसटी महामंडळाच्या बसमध्ये महिला प्रवाशांना 50 टक्के सूट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घोषित केला. आणि त्याच्या अंमलबजावणीला देखील सुरुवात झाली आहे. आता त्यापाठोपाठ चंद्रपूर-गडचिरोली ट्रॅव्हल्स असोसिएशनशी संलग्न असलेल्या खासगी ट्रॅव्हल्स मालकांनी देखील आपल्या बसमध्ये महिलांना 50 टक्के सूट देण्याची घोषणा केली आहे.

मंगळवारी संघटनेची तातडीने बैठक झाली आणि यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे या निर्णयावर आजपासून म्हणजे गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos