महत्वाच्या बातम्या

 १४ वे आदिवासी युवा आदान प्रदान कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील २० युवा झाले भारत भ्रमणासाठी रवाना


- 14 व्या आदिवासी युवा विनिमय कार्यक्रम 2022-23 अंतर्गत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गृह मंत्रालय, युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 14 व्या आदिवासी युवा विनिमय कार्यक्रम वर्ष 2022-23 अंतर्गत जगदीश मीना, पोलीस उपमहानिरीक्षक (ऑपरेशन) CRPF गडचिरोली, शैलेंद्र कुमार कमाण डेन ट 191 बटा O CRPF, नेहरू युवा केंद्र, गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जीवराज सिंह शेखावत, द्वितीय कमान अधिकारी 191 बटा0 CRPF यांच्या उपस्थितीत, 17 मार्च 2023 रोजी 191 बटा0 CRPF एटापल्ली मार्फत 12 व्या बॅचमधे 20 आदिवासी तरुणांना भारत भ्रमणासाठी पाठविण्यात आले. यामध्ये जम्मू-काश्मीर करिता 12 तर गुवाहाटी करिता 8 तरुणांचा समावेश आहे.

गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहाय्याने आणि आर्थिक सहाय्याने आणि नेहरू युवा केंद्र संघटनेच्या माध्यमातून वर्ष 2006 पासून वामपंथी उग्रवाद विभाग (LWE) भागातील आदिवासी युवकांच्या विकासासाठी आदिवासी युवा विनिमय कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. 14 व्या आदिवासी युवा विनिमय कार्यक्रम 2022-23 अंतर्गत आतापर्यंत 191 बटालियन CRPF च्या वतीने भारत भ्रमणासाठी 150 हून अधिक तरुणांना पाठवण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आदिवासी तरुणांना भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची जाणीव करून देणे, त्यांना विविधतेतील एकतेची संकल्पना आत्मसात करणे, त्यांना विकासात्मक उपक्रम आणि औद्योगिक प्रगतीची जाणीव करून देणे, त्यांना त्यांच्या समवयस्कांशी भावनिक संबंध विकसित करण्यात व त्यांचा स्वाभिमान वाढविण्यात मदत करणे आणि आदिवासी तरुणांना इतर क्षेत्रात प्रवृत्त करणे हा आहे. कार्यक्रमाच्या प्रमुख उपक्रमांमध्ये घटनात्मक अधिकारी, मान्यवर आणि प्रतिष्ठित व्यक्ती सोबत संवाद सत्रे, पॅनल चर्चा, व्याख्यान सत्र आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत उपक्रम, वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, कौशल्य विकास, करिअर मार्गदर्शनाशी संबंधित उद्योग भेटी, महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक स्थळांच्या भेटी इत्यादिचा समावेश आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos