ब्रम्हपुरी च्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या रिता उराडे, काँग्रेसने केले वर्चस्व सिद्ध


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  ब्रम्हपुरी :
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी नगर पालिकेच्या नगराध्यक्षपदी तब्बल २७ वर्षांनी  काँग्रेसच्या रिता उराडे ह्या ३ हजार ६०० मतांनी विजयी झाल्या आहेत. काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते व आमदार विजय वडेट्टीवार यांनी मतदारसंघातील महत्त्वपूर्ण नगर परिषद घेऊन वर्चस्व सिद्ध केले. 
ब्रम्हपुरी  नगरपरिषदेवर गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव असलेला हा चंद्रपूर जिल्ह्यातील भाग आहे. त्यामुळे या नगरपरिषदेवर सातत्याने भाजपचा ताबा राहिला होता. ब्रम्हपुरीमध्ये तब्बल २७ वर्षांनी काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून आलेला आहे. रिता उराडे यांनी भाजपच्या यास्मिन लखानी यांचा पराभव केला.
ब्रम्हपुरी नगरपरिषदेच्या २० सदस्यीय सभागृहात काँग्रेसचे १२ नगरसेवकही निवडून आले आहेत. भाजपचे ३  नगरसेवक निवडून आले तर इतरांनी ५ जागा पटकाविल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसचे विजय वडेट्टीवार एकमेव आमदार आहेत. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वर्चस्वालाही एकप्रकारे धक्का बसल्याचे बोलले जात आहे.    Print


News - Chandrapur | Posted : 2018-12-10


Related Photos