महत्वाच्या बातम्या

 आचारसंहितेमुळे ५ ऑक्टोबरचा लोकशाही दिन रद्द


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : ऑक्टोबर महिन्याचा पहिला सोमवार ५ ऑक्टोबर २०२६ रोजी येत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय, येथे दुपारी १ वाजता लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे सदर लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे.

नागरिकांच्या तक्रारी व निवेदनांवर कार्यवाही करण्याच्या उद्देशाने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार ५ ऑक्टोबर रोजी नियोजित लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार होता. तथापि, पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू असल्याने या महिन्यातील लोकशाही दिन रद्द करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.





  Print






Related Photos