महत्वाच्या बातम्या

 खासदार अशोक नेते यांच्या हस्ते इंदिरानगर येथील छत्रपती शिवाजी चौक व छत्रपती शिवाजी कॉलनीचा उद्घाटन सोहळा संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली शहरा लगतच्या इंदिरानगर प्रभाग क्रमांक ०६ येथील छत्रपती शिवाजी चौक व छत्रपती शिवाजी कॉलनी या नावाने ओळखल्या जाण्यासाठी बोर्ड फलक लावून पूजा अर्चना करून याचा शुभारंभ उद्घाटन या क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेचे जाणता राजे होते. त्यांनी प्रजेसाठी संघर्ष करून स्वराज्य स्थापन केले.

मराठा साम्राज्याचे संस्थापक, शूरवीर, नावाची गौरव गाथा करण्यासाठी छत्रपती शिवाजी चौक व छत्रपती शिवाजी कॉलनी या नावाने ओळखले जावे यासाठी आयोजित कार्यक्रम करण्यात आला.महाराज गडपती गजअश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्नश्रीपती अष्टवधानजागृत अष्टप्रधानवेष्टित न्यायालंकारमंडित शस्त्रास्त्रशास्त्र पारंगत राजनितिधुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधिश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. अशा जय घोषणाने उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

त्यावेळी खासदार अशोक नेते, माजी उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेवक आशिष पिपरे, बंडू चौधरी, किशोर पोचमपल्लीवार, आशिष घोडमारे, गौरक्षण लटारे, भास्कर कायते, मारकवार , जुमनाके, ज्ञानेश्वर कायते, वैरागडे, गुंडावार, तसेच अनेक महिला वर्ग व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos