वाढीव वीज देयकांबाबत २४ तासाच्या आत स्पष्टीकरण करा


-  विद्युत नियामक आयोगाचे अदानी कंपनीला निर्देश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई :
नियमानुसार ठरवून दिलेल्या दरापेक्षा वाढीव दराने विद्युत देयके आकारणीबाबत तक्रारींच्या अनुषंगाने 24 तासात स्पष्टीकरण करावे, असे निर्देश महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने अदानी इलेक्ट्रिसीटी मुंबई लि. ला दिले आहेत.
 महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने अदानी इलेक्ट्रिसीटी कंपनी वीज पुरवठा करत असलेल्या क्षेत्रामध्ये 1 सप्टेंबर 2018 पासून वीज दरात सुधारणा केली आहे. त्यानुसार सरासरी 0.24 टक्के इतकी वीज दरवाढ मंजूर करण्यात आली आहे.
 अदानी इलेक्ट्रिसीटीने नियमित दरापेक्षा खूप जास्त रकमेची वीज देयके ग्राहकांना पाठविल्याबाबत वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध होत आहेत. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने (एमईआरसी) या वृत्तांची गंभीर दखल घेतली आहे. मीटर नोंदीनुसार देयके पाठविण्याऐवजी सरासरी देयके पाठविल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आल्या असून त्यामुळे असंतोष निर्माण होत आहे. याबाबतची वस्तुस्थिती आणि आणि हाती घेतलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने 24 तासाच्या आत स्पष्टीकरण करावे, असे निर्देश महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने दिले आहेत.  Print


News - Rajy | Posted : 2018-12-05


Related Photos