महत्वाच्या बातम्या

 पॅनल अधिवक्ता यांच्या करीता प्रशिक्षण व परिसंवाद संपन्न 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर :
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष  एस. बि. अग्रवाल, यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूर. न्यायधिशांचे सभागृह, न्यायमंदिर, सिव्हिल लाईन्स येथे पॅनल अधिवक्ता यांचे करीता प्रशिक्षण व परिसंवादचे आयोजन करण्यात आले. पॅनल अधिवक्ता यांचे करीता आयोजित प्रशिक्षण व परिसंवाद यांचे उद्घाटक म्हणून एम. एस. आझमी, जिल्हा न्यायाधीश -1, नागपूर हे लाभले होते. तर प्रशिक्षक म्हणून पी. वाय. लाडेकर, जिल्हा न्यायाधीश -4 नागपूर, जयदीप गो. पांडे सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अँड घारे, वरिष्ठ अधिवक्ता, अँड. राजेन्द्र राठी सदस्य, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हे उपस्थित होते.

प्रथम सत्र पॅनल अधिवक्ता यांचे करीता आयोजित प्रशिक्षण व परिसंवादचे सुरवात राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांचे हक हमारा भी तो है गीत व्दारे सुरवात केली. पॅनल अधिवक्ता यांचे करीता आयोजित प्रशिक्षण व परिसंवादचे उद्घाटन जिल्हा न्यायाधीश -1 एम. एस. आझमी, यांच्या हस्ते करण्यात आले असून त्यांनी आपल्या उद्घाटनपर उद्बोधनात उपस्थितांना सांगीतले की, तुम्ही जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे पॅनल अधिवक्ता म्हणून काम करत असून गरीब व गरजू व्यक्तींना जिल्हा विधी सेवा

नागरिकांना पुरविण्यात येणा-या मोफत कायदे विषयक सहाय्य व सल्ला करीता काम करीत असता. पॅनल अधिवक्ता म्हणून काम करीत असतांना येणा-या नागरिकांना आपण निस्वार्थपणे व सक्षम सेवा दिली पाहिजे. कारण ते कुठल्या तरी समस्यांचे निराकरण करण्याकरीता आलेले असतात.तसेच वेळोवेळी अश्या प्रकारचे पॅनल अधिवक्ता व प्रशिक्षण व परिसंवाद आयोजित करायला पाहिजे. ज्यामुळे आपल्या नवनवीन कायदयांमधील तरतुदी बाबत माहिती होत राहिल. व्दितीय सत्रात पी. वाय. लाडेकर, जिल्हा न्यायाधीश -4, अँड. घारे, वरिष्ठ अधिवक्ता, जयदीप गो. पांडे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूर यांनी प्रशिक्षण सत्रामध्ये उपस्थित प्रशिक्षणार्थीना माहिती दिली.

पॅनल अधिवक्ता यांचे करीता आयोजित प्रशिक्षण व परिसंवाद करीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथील शंभरच्या वर पॅनल अधिवक्ता, अधिवक्ता व विधी विद्यार्थी उपस्थित असुन वकील मंडळींनी पॅनल अधिवक्ता प्रशिक्षण सत्र पूर्ण केले. प्रशिक्षण सत्राचे सुत्रसंचालन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्या अँड. सुरेखा बोरकुटे यांनी केले. तर आभार पॅनल अधिवक्ता रचना वासनिक यांनी केले.





  Print






News - Nagpur




Related Photos