दंतेवाडा मध्ये पोलीस - नक्षल चकमक, आठ नक्षल्यांना अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था /  दंतेवाडा :
छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात हिरोली डोकापारामध्ये पोलीस आणि नक्षल  यांच्यात चकमक झाली. या चकमकीत पोलिसांनी नक्षलवाद्यांचे कॅम्प उद्ध्वस्त केले आहे. तसेच, आठ नक्षलवाद्यांना अटक केली आहे. 
पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लव यांनी दिलेल्या माहितीनुसार , दंतेवाडामधील किरंदुल पोलीस स्टेशन परिसरात  पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. यावेळी नक्षलवाद्यांकडून वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार करण्यात आला. मात्र, पोलिसांना नक्षलवाद्यांना सडेतोड उत्तर देत कॅम्प उद्ध्वस्त केले आणि नक्षलवाद्यांना अटक केली. डीआरजी, सीआरपीएफ आणि किरंदुल पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी अटक केलेल्या नक्षलवाद्यांकडून शस्त्रसाठा जप्त केला आहे.    Print


News - World | Posted : 2018-11-30


Related Photos