अटल विश्वकर्मा सन्मान योजनेचा अर्ज शासनाकडून मोफत मात्र दलालाकडून अर्जांची ५० रुपयात विक्री


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कुरखेडा : 
अटल विश्वकर्मा सन्मान योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांची विशेष नोंदणी अभियान कुरखेडा येथील नगरपंचायतच्या सभागृहात मध्ये सुरु आहे .या योजनेमध्ये बांधकाम कामगारांना योजनेचा अर्ज  हा मोफतच पुरवठा केला जातो .परंतु कुरखेडा तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात  अर्जाच्या झेराक्स काढून  ग्रामीण भागातील  लोकांन कढून ५० रूपये व त्या पेक्षा जास्त रकम वसूल करण्याचा अनोखा प्रकार  तालुक्यात दिसून आला आहे .
   कामगार वर्गाची लूटमार दलाल स्वरूपात असलेल्या व्यक्ती कडून व कुंभीटोला  येथील एका ग्रामपंचायत कर्मचाऱ्याकडून सुरु असल्याची माहिती आहे.  नागरिकांकडून  अर्जाचे ५० रुपये घेतले  व सामन्य पावती २० रुपयांची देण्यात आली .या संदर्भात ग्रामसेवक जे .आर .बरडे यांना विचारणा केली असता मला या संदर्भात कसलीच माहीती नाही व मी शिपायाला असलं काही करायला सांगितल नाही असे त्यांनी सांगीतले. अशाप्रकारे गोरगरीबांची लूटमार केली जात आहे. .एकीकड़े शासन स्तरावरून कामगारांचा सन्मान व्हावा असा उदेश्य असतो तर दुसरी कड़े त्याची लुबाडणूक होत असल्याचे चित्र कुरखेडा तालुक्यात दिसून येत आहे .  अशा लुबाडणूक करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-30


Related Photos