महत्वाच्या बातम्या

 पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथी साजरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर :  स्थानीय भारतीय जनता पार्टी द्वारे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. प्रखर राष्ट्रवादी उत्कृष्ट संगठनकर्ता, भारतीय जनसंघाचे माजी अध्यक्ष पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमित्य भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयामध्ये वरिष्ठ नेते तथा वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदन सिंह चंदेल यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, भाजपाचे शहर अध्यक्ष काशीनाथ सिंह, शिवचंद द्विवेदी, महासचिव मनिष पांडे, निलेश खरबळे, समीर केने, रेणुका दुधे, वैशाली जोशी, जयश्री मोहुर्ले, आरती आक्केवार, राजु दासरवार, छगन जुमडे, घनश्याम बुरडकर, प्रकाश दोतपल्ली, मिथिलेश खेंगर, किशोर मोहूर्ले, कैलाश गुप्ता, प्रशांत दारला, साई अलगेवार व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos