अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू : कुरखेडा- कोरची मार्गावरील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी /  कुरखेडा :
  अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना १५ नोव्हेंबर च्या रात्री ९ वाजताच्या सुमारास कुरखेडा- कोरची मार्गावरील पुराडा पासून दीड किलोमीटर अंतरावर घडली. पंकज नरोटे (२१) यशवंत किरंगे (३२) दोन्ही राहणार डोंगरगाव, तालुका कुरखेडा अशी मृतकांची नावे आहेत. 
 मृतक पंकज व यशवंत हे दोघेही दुचाकीने पुराडावरून डोंगरगाव ला जात असताना रात्रौ साडेनऊ वाजताच्या सुमारास पुराडा पासून दीड किलोमीटर अंतरावर अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकी वाहनाला जब्बर धडक दिली . यात दुचाकीस्वार जागीच ठार झाले.  या अपघाताची नोंद पुराडा पोलीस स्टेशन येथे करण्यात आली असून पुढील तपास पुराडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार उमेश महाले यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलिस उपनिरीक्षक सुखदेव गोदे करीत आहेत. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-16


Related Photos