महत्वाच्या बातम्या

 समर्थ महाविद्यालय येथे स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : स्थानिक राष्ट्रीय शिक्षण संस्था द्वारा संचालित समर्थ महाविद्यालय, लाखनी येथे समर्थ स्टडी सेंटर आणि स्टूडेंट्स राइट्स फाउंडेशन यांच्या वतीने स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. 

यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य दयानंद मेश्राम, अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचेे प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे, प्रमुख अतिथी म्हणून स्टूडेंटस राईटस फाऊंडेशन, नागपूरचे प्रमुख उमेश कौराम व समर्थ स्टडी सर्कल प्रमुख डॉ. धनंजय गभणे व अजिंक्य भांडारकर उपस्थित होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य दयानंद मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेकडे वळण्याचा सल्ला दिला असून कोचिंग करूनच पास होत नाही तर परिपूर्ण अभ्यास करून पास होतात. म्हणून भविष्यात टिकायचे असेल तर आजच अभ्यासाला लागा, असे ते बोलत होते. 

कार्यक्रमाला स्टूडेंट्स राइट्स फाउंडेशन, नागपूरचे प्रमुख उमेश कौराम यांनी बार्टी आणि महा ज्योती या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शैक्षणिक योजनेबाबद माहिती विद्यार्थ्यांना दिले. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात महाविद्यालयाचेे प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे यांनी विद्यार्थ्यांना आपण कुठे उभे आहोत याची जाणीव करून दिले. स्पर्धा परीक्षा म्हणजे प्रचंड गर्दी असते. १० जागा असतील तर १ हजार फॉर्म भरले जातात. त्यामुळे आपण त्या परीक्षेला झोकून दिले पाहिजे. तरच आपल्याला यश मिळेल असे ते आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात बोलत होते. 

कार्यक्रमाचे संचलन प्रा. युवराज जांभुळकर तर प्रास्ताविक डॉ. धनंजय गभणे यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील पदवी, पदवीत्तर आणि स्पर्धा परीक्षा अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Bhandara




Related Photos