महत्वाच्या बातम्या

 देवतळे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चामोर्शी : कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर ग्रामपंचायत तथा ग्रामवासी सोनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त ग्रामविकास, आरोग्य आणि मतदार जनजागृतीसाठी युवा या संकल्पनेवर आधारित शिबिर ३१ जानेवारी ते ०६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून घेण्यात आले. ०१ फेब्रुवारी २०२३ ला डी. एन. चापले सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन सोहळा पार पडला. उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटक शेषराव कोहळे, उपसरपंच ग्राम पंचायत सोनापूर हे होते. ०२ फेब्रुवारी २०२३ ला प्रा. डॉ. आर. एम. झाडे यांचा अध्यक्षतेखाली लोकशाहीत मतदानाचे महत्व व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला, या कार्यक्रमाचे मार्गदर्शक लोखंडे , नायब तहसीलदार चामोर्शी तसेच तुषार दुधबावरे, अभ्यासिका मार्गदर्शक चामोर्शी हे होते.

०३ फेब्रुवारी २०२३ ला प्रा. दीपक बाबनवाडे यांच्या अध्यक्षतेखाली पशू आरोग्य चिकित्सा व शासकीय योजना तसेच कृषी विकास योजना या विषयावर डॉ. नागदेवते , पशू वैद्यकीय अधिकारी वायगाव व डॉ. चकोर ,पशू वैद्यकीय अधिकारी, कोनसरी तसेच गजभिये , मंडळ कृषी अधिकारी चामोर्शी यांनी मार्गदर्शन केले. ०४ फेब्रुवारी २०२३ ला प्रा. वैशाली कावळे यांच्या अध्यक्षतेखाली गावकऱ्यासाठी आरोग्य शिबीर घेण्यात आले त्यामध्ये सिकलसेल तसेच विविध आरोग्य तपासण्या करून मोफत औषधोपचार करण्यात आले. तसेच गावातील तरुण व शिबीरार्थी एकूण ११ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या प्रसंगी मार्गदर्शक म्हणून डॉ. शिल्पा गभने मॅडम, पुरुषोत्तम घ्यार, व राजेंद्र अल्लिवार समुपदेशक ग्रामीण रुग्णलय चामोर्शी, तसेच कुशल कवठेकर, औषध निर्माण अधि., कु. प्राजक्ता फावनवारे व कु. रीना रॉय प्रयोगशाळा तंत्रज्ञ तसेच सतीश टेकलवार, टेक्निशियन जिल्हा रुग्ण. गडचिरोली हे उपस्थित होते. नंतर प्रा. डॉ. राजेंद्र झाडे यांच्या अध्यक्षतेखाली माजी राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थांचे स्नेहमिलन कार्यक्रम घेण्यात आला. 

शिबिरादरम्यान दिनक्रमानुसार दररोज सकाळी प्रार्थना, योगासन, मतदान जनजागृती फेरी, तसेच अल्पोहार झाल्यानंतर श्रमदान करण्यात येत होते, याशिवाय रात्री सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मराठी, बंगाली, गोंडी, छत्तीसगडी, हिंदी भाषेवर आधारित नृत्य तसेच पटनाट्य, नकला असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच गोंडवाना विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या निर्देशानुसर विद्यापीठ आपल्या गावी या मथळ्याखाली सर्वे करण्यात आला. ०५ फेब्रुवारी २०२३ ला डी.एन.चापले, सदस्य शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली समारोपीय कार्यक्रम पार पडला, या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अरुण पाटील मुनघाटे, सदस्य शि. शि. प्र. मंडळ गडचिरोली, सौ. गोपीकाताई टेकाम, सरपंच ग्राम पंचायत सोनापूर, शेषराव कोहळे, उपसरपंच ग्राम पंचायत सोनापूर, ग्राम पंचायत सदस्य सर्वश्री उत्तम कावे, अनिल उंदिरवाडे, उषाताई चलाख, सविताताई  कुनघाडकर, अरुण कुनघाडकर, माजी उपसरपंच सोनापूर, राम बरसागडे, अध्यक्ष शा.व्य.स.सोनापूर, छत्रपती सातपुते, अध्यक्ष तं. मु .स. सोनापूर, प्राचार्य डॉ. डी. जी. म्हशाखेत्री के.डी.डी.महा.चामोर्शी हे उपस्थित होते. 

या प्रसंगी शिबिरार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त केले व शिबिरात आलेले आपले अनुभव सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा अहवाल वाचन प्रा. स्नेहा उसेंडी यांनी केले. तर संचालन समिर गुडेंकवार यांनी केले. तर आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. आर.डी.बावणे यांनी मानले.शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना सहकार्यक्रम अधिकारी प्रा. मिनल गाजलवार, प्रा. संकेत राऊत, प्रा. स्नेहा उसेंडी, प्रा. अरुण कोडापे, तसेच प्रा. डॉ. आर.एम. झाडे, प्रा. दीपक बाबनवाडे, प्रा.वंदना थुटे, प्रा.वैशाली कावळे, प्रा.भूषण आंबेकर, प्रा. मनीष राऊत, तसेच रवी कराडे, चंद्रपाल राठोड, निलेश कुनघाडकर व राष्ट्रीय सेवा योजना शिबीरार्थी तसेच सोनापूर ग्रामवसी यांनी सहकार्य केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos