महत्वाच्या बातम्या

 पदव्युत्तर अभ्यासक्रमही आता ऑनलाइन : येत्या शैक्षणिक वर्षापासून पुणे विद्यापीठ करणार अंमलबजावणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार, येत्या शैक्षणिक वर्षापासून पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या 20 टक्‍के अभ्यासक्रम मूक अथवा स्वयम या ऑनलाइन माध्यमातून पूर्ण करण्यास विद्यार्थ्यांना परवानगी देण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला आहे.

पदवीच्या विद्यार्थ्यांना 20 टक्‍के ऑनलाइन पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षापासून मान्यता देण्यात आली आहे.

यूजीसीच्या नियमावलीनुसार मॅसिव्ह ओपन ऑनलाइन कोर्स (मूक) अथवा स्वयम किंवा तत्सम ऑनलाइन अभ्यासक्रम विद्यापीठ व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना लागू करण्यासाठी डॉ. सजीव सोनवणे यांची समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी व त्यासंदर्भात रूपरेषा ठरविण्यासाठी डॉ. एम. जी. चासकर यांच्या समितीने अहवाल सादर केला होता. त्यास मान्यता देण्यात आली आहे.

विद्यापीठ शैक्षणिक विभागातील सर्व अभ्यासक्रम व संलग्न महाविद्यालये तथा मान्यताप्राप्त संस्थांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांना 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र पदवी अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन पद्धतीची अंमलबजावणी 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे. हा ऑनलाइन अभ्यासक्रम हे केवळ वैकल्पिक अथवा जादा क्रेडिटसाठी करण्यास परवानगी राहणार आहे, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.


ऑनलाइन अभ्यासक्रम निवडण्यासाठी पर्याय

- मूक अथवा स्वयम अभ्यासक्रम

- यूजीसीने मान्यता दिलेले अभ्यासक्रम

- आंतरराष्ट्रीय स्तरावरील मूक अभ्यासक्रम

- पुणे विद्यापीठाने मान्यता दिलेले अभ्यासक्रम





  Print






News - Rajy




Related Photos