अवनीच्या बछड्यांचा आठवडाभरानंतरही शोध नाही


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / यवतमाळ :
  अवनी वाघिणीला ठार मारल्यावर तिच्या दोन बछड्यांचे शोधकार्य सुरु आहे. मात्र आठवडाभरानंतरही शोध लागलेला नाही.  बछड्यांच्या  पायाचे ठसे वेडशी व अंजी या गावाजवळ बेंबळा प्रकल्पाच्या कॅनालनजिक आढळून आल्याने शुक्रवारी सकाळपासून या बछड्यांना पकडण्याची मोहीम सुरु झाली होती, पण सायंकाळपर्यंत या बछड्यांचा शोध लागला नाही. त्यामुळे आजही पथक परत आले आहे. 
या बछड्यांचे वय पाहता ते शिकार करू शकत नाही. त्यांची उपासमार होऊ नये म्हणून वन विभागाने काही कोंबड्या, मांसाचे तुकडे जंगलात ठेवले होते. पण ते खाण्यास हे बछडे न आल्याने त्यांना खाद्य कसे मिळत असेल याची काळजी वनाधिकाऱ्यांनी पडली होती. पण जंगलात असलेल्या टी -२ वाघाने या बछड्याना आसरा दिला असून त्यांच्या खाद्याची व्यवस्था हाच वाघ करीत असल्याची चर्चा आहे. दरम्यान दिवाळी असली तरी या बछड्याना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरूच आहे. या बछड्यांना लवकर पकडणे आवश्यक असून जर विलंब होत गेला तर वाढत्या वयाबरोबर हे बछडे नरभक्षक बनतील अशी भीती व्यक्त होत आहे.    Print


News - Rajy | Posted : 2018-11-10


Related Photos