महत्वाच्या बातम्या

 फुले महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर चपराळयात संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / आष्टी : वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दत्तक ग्राम चपराळा येथे जल व्यवस्थापन तथा आरोग्य जनजागृतीसाठी युवाशक्ती या संकल्पनेवर आधारित विशेष श्रम संस्कार शिबिर विविध लोकोपयोगी कार्यक्रमांनी संपन्न झाले. 

युवकांच्या शक्तीच्या ऊर्जेचा व अंतर्गत उर्मीचा वापर विधायक कार्यासाठी व्हावा. स्वतंत्र भारतातील शिक्षण घेत असलेल्या युवकांना ग्रामीण परिसराची जाणीव व्हावी, त्यांची सामाजिक कार्यात रूची वाढावी, श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व कळावे, नवे नेतृत्व समाजात निर्माण व्हावे, याकरिता राष्ट्रीय सेवा योजना सुरू करण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजनेतून युवकाचा सर्वांगीण विकासाकरिता श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्राणहिता नदी काठावरील जंगलव्याप्त, अति दुर्गम, सीमावर्ती अशा चपराळा या गावी सात दिवसीय निवासी शिबिरात विविध उपक्रमाने  शिबिरार्थींनी ग्रामजीवनाचे अवलोकन करीत आनंद घेतला. शिबिराचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या तथा महिला नेतृत्व शाहीन बबलू हकीम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी वनवैभव शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष बबलूभैय्या हकीम हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य गजानन लोनबोले, सरपंच निखिल मडावी, उपसरपंच दयानंद कोकेवार, प्राचार्य संजय फुलझेले, प्राचार्य प्रकाश दुधबावरे, मुख्या. तिरुपती येगेवार, वनरक्षक आर्. एम. लिपटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शितल गुरनुले, उपाध्यक्ष व्यंकन्नाजी बंटीवार, ग्रामपंचायत सदस्य छायाता आदे, तलाठी महिंद्रे, आरोग्य सेविका छाया बीटपल्लीवार, पुष्पा बोटावार, डॉ.राजकुमार मुसने, डॉ. भारत पांडे, डॉ. गणेश खुणे, प्रा. रवी गजभिये, प्रा. ज्योती बोबाटे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. उद्घाटक शाहीन हकीम यांनी विद्यार्थ्यांनी सामाजिक समस्येचे भान ठेवत गावाशी अनुरूप प्रबोधनात्मक परिवर्तनाचा संदेश ग्रामस्थांना द्यावा असे आवाहन केले .शिबिरा दरम्यान डॉ.राजकुमार मुसने यांच्या नेतृत्त्वात पशू चिकित्सा व  घटसर्प, एकटांगा आजारावरचे लसीकरण शिबीर घेण्यात आले.

पशुधन आयुक्त डॉ. रामकृष्ण देवकुळे, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सचिन ढालकरी, उपसरपंच दयानाथ कोकेरवार, पशुधन पर्यवेक्षक प्रमोद निमसरकार, अशोक, ममता भैसारे, गेडाम, देवमन निमसरकार, प्रा.बी.के. राठोड यांनी पशु चिकित्सा शिबिरामध्ये गावातील पशुंची तपासणी आणि लसीकरणही करण्यात आले. प्रसंगी प्रसुती दरम्यान अडथळा निर्माण झालेल्या सुरेश कोकेरवार यांच्या म्हशीवर शस्त्रक्रिया करून म्हशीचे प्राण वाचविण्यातही यश मिळाले. गोठ्यांची सफाई ग्रामस्थांच्या सहकार्याने रासेयो स्वयंसेवकांनी करून पशुंची निगा कशी राखावी, याविषयी डॉ.देवकुळे व डॉ.ढालकरी यांनी मार्गदर्शन केले.

आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी उपकेंद्र चपराळाच्या सहकार्याने आरोग्य तपासणी शिबिरात वैद्यकीय अधिकारी डॉ .खुशबू करंगाम, आरोग्य सेविका छाया बीटपल्लीवार, आशावर्कर पुष्पा बोटावर, जगदंबा टोकलवार, यशवंत तिम्मा यांनी १०४ रुग्णांची तपासणी करून मोफत औषधी वितरित करण्यात आली. नेत्रतज्ञ डॉ. रमेश कलकोटवार यांनी शाळेतील मुले, शिबिरार्थी व ग्रामस्थांच्या डोळ्यांची तपासणी करून उपचार केले. मोबाईलचा अतिवापर टाळून डोळ्यांची निगा कशी राखावी याविषयी डॉ. रमेश कलकोटवार यांनी मार्गदर्शनही केले. कॅन्सर व सिकल सेल जनजागृती कार्यक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालय आष्टी येथील समुपदेशक आशा सोनवणे यांनी मार्गदर्शन केले तर क्षयरोगाविषयी मनोज बगमारे यांनी मार्गदर्शन केले.

बौद्धिक कार्यक्रमात महिला बचत गट आणि ग्रामविकास या विषयावर प्रा. विजया बलकी यांनी, लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी मतदार जनजागृती या विषयावर डॉ. गणेश खुणे व मा. उरते सर यांनी, मानवाधिकार यावर ऍड. सचिन मेकाले यांनी. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या विषयावर प्रा. ज्योती बोबाटे यांनी पर्यावरण संवर्धन या विषयावर डॉ.भारत पांडे व प्रा. कोरडे यांनी जल व्यवस्थापन या विषयावर डॉ. संजय फुलझेले, प्रा. रवी गजभिये यांनी लघुउद्योग आणि रोजगार निर्मिती या विषयावर डॉ. रवी शास्त्रकार यांनी मार्गदर्शन केले.

प्राणहिता नदी पात्रातील निर्माल्य व प्लास्टिक केरकचरा निर्मूलन करून जलप्रदूषण रोखण्यासाठीसुद्धा स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला. श्री हनुमान मंदिर प्रशांत धाम चपराळा येथे अनेक भाविक पदयात्रा करीत आले असताना त्या भाविकांसमोर सकाळी योगनृत्य करून आरोग्य जनजागृती केली तथा मंदिर परिसर प्लास्टिक मुक्त करून सर्वत्र सफाई करण्यात आली. दररोज सकाळी योगा, प्राणायाम, योग नृत्य नंतर ग्रामसफाई, दुपारी बौद्धिक कार्यक्रम आणि सायंकाळी प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमातून ग्रामस्थांचे करमणूक व प्रबोधन करण्यात आले. प्रा. मुसने यांच्या मार्गदर्शनात ग्राम सर्वेक्षण करण्यात आले. तेथील लोकगीते, झडत्या, लोककथा असे लोकसाहित्याचे संकलन, कुटुंबे, बेरोजगारी, उच्च शिक्षणाचे प्रमाण, आजार, रुग्णांची संख्या आणि मतदार यांची नोंदणी या अनुषंगाने सर्वेक्षण करण्यात आले.

समारोपीय कार्यक्रमात उपसरपंच दयानाथ कोकेरवार यांनी आमच्या आडवळणाच्या गावी हे शिबिर आयोजित करुन गावकऱ्यांना मेजवानी उपलब्ध करून  दिल्याबद्दल महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.राजकुमार मुसने व प्राचार्य संजय फुलझेले यांचे आभार मानले. महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष साईनाथ गुरनुले यांनी शिबिरार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. ज्योती बोबाटे यांनी तर उपस्थितांचे आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. राजकुमार मुसणे यांनी मानले. वंदे मातरम या गीताने शिबिराची सांगता करण्यात आली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तथा सवयं सेवकांनी सहभाग सहकार्य केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos