महत्वाच्या बातम्या

  वरोऱ्याचा प्रशिक जाधव सीनियर गट महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघात निवड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वरोरा : वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशन वरोरा व लोक शिक्षण संस्था, वरोराचा खेळाडू प्रशिक जाधव याची गुवाहाटी आसाम येथे 2 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या सीनियर गट राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धे करिता महाराष्ट्र संघात निवड झालेली आहे. प्रशिक याने यापूर्वी शालेय महाराष्ट्र संघ, व ज्युनिअर गट महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. प्रशिकच्या यशाबद्दल लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक श्रीकांत पाटील , उपाध्यक्ष श्रीकृष्ण घड्याळ पाटील,  सुनील बांगडे, हेमंत घिवे, राजेश मत्ते, वरोरा स्पोर्टस फाउंडेशन वरोराचे अध्यक्ष गजानन जीवतोडे यांनी अभिनंदन केले, प्रशिक यांनी आपल्या यशाचे श्रेय वरोरा स्पोर्ट्स फाऊंडेशनचे जेष्ठ खेळाडू देवानंद डुकरे, विनोद उंमरे, निखिल बोबडे यांना दिले. प्रशिक याच्या यशाबद्दल वरोरा शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos