जावई चा घरी आलेल्या सासऱ्याचा अपघाती मृत्यू
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर येथील रेल्वे चौक येथे दुपारच्या सुमारास अपघात होऊन एक वृद्ध ठार झाले.
प्राप्त माहितीनुसार रेल्वे चौक येथे एका पादचारी व्यक्तीस 18 चाकी ट्रक क्र. MH 32 AJ 3596 ने चिरडले असून त्या व्यक्तीचे घटना स्थळीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृत्यू व्यक्तीचे नाव मोहंमद फारुक अब्दु्ल गफ्फार वय 70 वर्ष असून ते हिंगणघाट जिल्हा वर्धा येथील निवासी आहे.
ते आपल्या जावई चा घरी आले होते.
या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाले होते. घटनेची माहिती बल्लारपूर पोलिसांना मिळताच परिस्थितीवर नियंत्रण मिळविले व संबधित व्यक्तीचा मृतदेह शव विच्छेदन करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.
News - Chandrapur