महत्वाच्या बातम्या

 आरोग्यासाठी कोणतीही तडजोड नाही, कर्करोगाच्या जनजागृतीसाठी मोहीम राबवा


- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे निर्देश 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : तंबाखू सेवनाने कर्करोग होतो. जिल्ह्यातील पुरुषासोबतच महिलांचे तंबाखू खाण्याचे प्रमाण जास्त आहे. त्याबाबत जनजागृती करण्यासाठी आरोग्य विभागाने कर्करोग  (कँसर) जनजागृती मोहीम राबवावी. त्यासोबतच ग्रामीण व शहरी भागात शिबीराचे आयोजन करुन आरोग्य तपासणी करावी, आरोग्यासाठी कोणतीही तडजोड नसून जिल्ह्यात आरोग्यदायी वातावरण निर्माण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात आयोजित राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय व सनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी  योगेश कुंभेजकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधूरी  थोरात, आरोग्य विभागाचे अधिकारी व समिती सदस्य यावेळी उपस्थित होते. 

महिलांमध्ये हा आजार वाढत असल्याने छातीचे कँसर, पोटाचे कँसर व घशाचे कँसर तंबाखु सेवानाने वाढत आहेत. यासाठी आरोग्य विभागाने खाजगी डॉक्टर व स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने जिल्हाभर शिबीराचे आयोजन करुन मोहीम राबवावी, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

शाळा व महाविद्यालयाच्या 100 मीटर अंतरामध्ये असलेली पानटपरी व इतर अमली पदार्थांचे दुकाने हटविण्याबाबत शिक्षण विभागाला मुख्याध्यापकांनी पत्र दयावे. त्यात त्यांचे नाव व पत्ते नमूद करावे. त्यावर शिक्षण विभागाने कोटपा कायदा 2003 नूसार कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.

शाळा व महाविद्यालयातील दर्शनिय भागात पोस्टर लावावे व तंबाखु नियंत्रणाबाबत मुलांमध्ये जनजागृती करावी. जिल्ह्यातील सर्व पालकांनी मुलांचे  जंतांच्या प्रादुर्भावापासून संरक्षण करण्यासाठी आयोजित मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

शाळा व अंगणवाडी पातळीवरुन देण्यात येणारी जंतनाशक गोळी ही यावर परिणामकारक आहे. त्यामुळे आरोग्य विभागासह शिक्षण विभाग, एकात्मिक बालविकास विभाग विभागांनी एकत्रितपणे ही मोहीम राबविण्याचे त्यांनी सांगितले.

तालुकानिहाय, गावनिहाय व आरोग्य केंद्र निहाय शिबीराचे आयोजन करा. जास्तीत जास्त महिलांना या मोहिमेचा लाभ झाला पाहिजे. ओरल हेल्थ कँपचे आयोजनातून दंतरोग आजारावर मात करा, त्यासाठी मोबाईल व्हॅनचा वापर करा, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी गृह, शिक्षण, कृषी आरोगय, अन्न व औषध प्रशासन आदी तंबाखू नियंत्रणशी संबंधित विभागासोबत तंबाखू दुष्परिणामाबाबतचा आढावा यावेळी घेण्यात आला.





  Print






News - Nagpur




Related Photos