वणी येथील बस स्थानकाजवळ अपघात : एक ठार , एक जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मारेगाव : 
वणी बस स्थानकाजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरून जाणारा ५५ वर्षीय इसम ठार तर तरुण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
वणी बस स्थानकाजवळ दुचाकीवरून उसगाव (नकोडा) येथील विठ्ठल लिंगन्ना अशफवार (५५) व सोबत एक तरुण दुचाकी ने बस स्थानकाकडे येत असताना मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने विठ्ठल गंभीर जखमी झाला होता. तर सोबत असलेला तरुण सुद्धा जखमी अवस्थेत होता. उपस्थित असलेल्या लोकांनी दोघांनाही वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र विठ्ठल चा मृत्यू झाला होता. अद्याप तरुणांची ओळख पटली नाही.  Print


News - Rajy | Posted : 2018-08-16


Related Photos