ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांचा वर्धा जिल्ह्यावर दौरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे १० ऑगस्ट रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.
सोमवार १० ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता हिंगणघाट येथे आगमन व उपजिल्हा रुग्णालय, हिंगणघाट येथील ४०० खाटांच्या रुग्णालयाच्या भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी १० वाजता अनुसया पॅलेस, शहालंगडी हिंगणघाट येथे आयोजित आरोग्य अमृत महोत्सव महाआरोग्य शिबिर सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी १ वाजता छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड, हिंगणघाट येथे आयोजित विविध शेतकरी व सामाजिक कल्याणकारी योजनांच्या लाभ वितरण कार्यक्रमास उपस्थिती.
दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा येथे सत्कार समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी ४ वाजता जिल्हा परिषद सभागृह येथे जिल्ह्यातील ग्रामविकास विभागामार्फत राबाविण्यात येत असलेल्या योजनांच्या आढावा बैठकीस उपस्थिती. सायंकाळी ५ वाजता स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी ६.२० वाजता विश्रामगृह येथे राखीव. रात्री ८ वाजता वर्धा येथून नागपूरकडे प्रयाण करतील.
News - Wardha




Petrol Price




