नागरिकांमध्ये संताप : पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : शहरातील लांझेडा वॉर्ड ते इंदिरानगरदरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला खुलेआम दारूविक्री सुरू असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. महामार्गालगतच झोपडी उभारून दोन व्यक्तींकडून राजरोसपणे अवैध दारूविक्री सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या मार्गावरून दिवसभर तसेच रात्रीही नागरिकांची मोठी वर्दळ असते.
महामार्गालगत अशाप्रकारे दारूविक्री सुरू असल्याने परिसरातील कायदा-सुव्यवस्था तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः रहदारीच्या ठिकाणीच दारूविक्री होत असल्याने अपघात आणि अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
अवैध दारूविक्रीचा हा प्रकार उघडपणे सुरू असतानाही संबंधित यंत्रणांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. गडचिरोली पोलिसांनी या प्रकाराची तातडीने दखल घेऊन महामार्गालगत सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीवर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




