महत्वाच्या बातम्या

 जुगार अड्ड्यावर भद्रावती पोलिसांची धाड : ९ जण ताब्यात, ५.९८ लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : भद्रावती येथील डोलारा तलाव परिसरातील पंचशील नगर येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर भद्रावती पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री धाड टाकून नऊ जणांना रंगेहात पकडले. या कारवाईत सात मोटारसायकली, सहा मोबाईल फोन व रोख रकमेसह एकूण ५ लाख ९८ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, ३० जुलै २०२६ रोजी रात्री भद्रावती पोलीसांना मुखबिराकडून डोलारा तलाव, पंचशील नगर येथे काही व्यक्ती पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हार-जितीचा जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकून धिरज शंकर शेट्टी (वय ३२), रा. झिंगूजी वॉर्ड, भद्रावती, ऋषीकेश भांकर मडावी (वय २५), रा. पंचशील वॉर्ड, भद्रावती, मुकेश वासुदेव सोना (वय ३५), रा. डोलारा तलाव, भद्रावती, अजित शंकर शेट्टी (वय २८), रा. किल्ला वॉर्ड, भद्रावती, मन्नु वासुदेव सोना (वय ३८), रा. डोलारा तलाव, भद्रावती, अमित ओमप्रकाश टेभुर्णे (वय २६), रा. पंचशील नगर, भद्रावती, उमेश भामराव रणदिवे (वय ३५), रा. डोलारा तलाव, भद्रावती, राकेश नामदेव कुळमेथे (वय ३५), रा. पंचशील नगर, भद्रावती आणि सोनू ज्ञानेश्वर ढेंगळे (वय ३६), रा. किल्ला वॉर्ड, भद्रावती यांना ताब्यात घेतले.

आरोपींची अंगझडती व घटनास्थळाचा पंचनामा करताना सात मोटारसायकली, सहा मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण ५ लाख ९८ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यातील कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

सदर ची कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गजानन तुपकर, संतोष केदार, सफौ. महेंद्र बेसरकर, पोलीस हवालदार अनुप आस्टुनकर, देवानंद डुकरे, गोपाल आतकुलवार तसेच पोलीस अंमलदार खुशाल कावळे, योगेश घाटोळे, संतोष राठोड आणि भद्रावती पोलीस ठाण्याच्या पथकाने सहभाग घेतला.





  Print






News - Chandrapur




Related Photos