गोसेखुर्द धरण परिसरात पर्यटकांची वाढली गर्दी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जा प्राप्त असून, वैनगंगा नदीवर उभारण्यात आलेला हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. गोसे गावाजवळ बांधण्यात आल्याने या प्रकल्पाला गोसेखुर्द धरण’असे नाव देण्यात आले आहे.
सध्या वैनगंगा नदीतील जलसाठ्यात मोठी वाढ झाल्याने गोसेखुर्द धरण तुडुंब भरले आहे. इतर धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे गोसेखुर्द धरणाचे ३३ पैकी १५ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत.
धरणातून वाहणाऱ्या पाण्याचे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. अनेक पर्यटक स्वतःच्या वाहनाने, तर काही बसने धरण परिसरात पोहोचून निसर्गसौंदर्याचा आनंद घेत आहेत.
पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे परिसरातील स्थानिक तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत असून, छोट्या व्यवसायांनाही याचा फायदा होत आहे.
News - Bhandara




Petrol Price




