महत्वाच्या बातम्या

 गुंजेवाही येथे सहयोग बँक व उडान फाउंडेशनतर्फे १०० गरीब विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी शाखा शिंदेवाही व उडान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गुंजेवाही येथील जिल्हा परिषद शाळेत १०० गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे मोफत वाटप करण्यात आले.

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवरील शैक्षणिक साहित्याचा भार कमी व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना आकर्षक व दर्जेदार स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले. बॅग मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विनोद कोवे, बँकेचे व्यवस्थापक दिनेश रहाटे, स्मिता तेलावर, राकेश बोरकुंडवार, विकेश पाकमोडे, विकी, शिक्षक खोब्राकडे सर नागदेवते सर, सोनटक्के उपस्थित  उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित शाळेत उपस्थित राहून मन लावून शिक्षण घेण्याचे आवाहन केले.

तसेच भविष्यातही अशा सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.या उपक्रमाचे पालक, शिक्षक व ग्रामस्थांनी स्वागत करत सहयोग बँक आणि उडान फाउंडेशनचे आभार मानले.





  Print






News - Chandrapur




Related Photos