महत्वाच्या बातम्या

 अल्पवयीन चालकांविरोधात गोंडपिंपरी पोलिसांचा इशारा : १३ पालकांचे समुपदेशन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : रस्ता अपघातांना आळा घालण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे या उद्देशाने गोंडपिंपरी पोलीस ठाण्याच्या वतीने आज, सोमवारी २० जुलै रोजी अल्पवयीन दुचाकी चालकांच्या १३ पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचे समुपदेशन करण्यात आले. यावेळी वाहतूक नियमांचे पालन, अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास परवानगी न देणे तसेच कायदेशीर जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

समुपदेशनादरम्यान पालकांना अल्पवयीन मुला-मुलींना कोणत्याही परिस्थितीत दुचाकी चालविण्यास देऊ नये, विनापरवाना वाहन चालविण्यामुळे होणारे अपघात आणि त्याचे गंभीर परिणाम याची माहिती देण्यात आली. तसेच अशा प्रकरणांमध्ये वाहनधारक व पालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार होणाऱ्या कायदेशीर कारवाईचीही जाणीव करून देण्यात आली.

यावेळी दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले. मुलांमध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्याची सवय रुजविण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पोलिसांनी केले यापुढे अल्पवयीन व्यक्ती वाहन चालविताना आढळल्यास संबंधित वाहनधारक व पालकांविरुद्ध प्रचलित मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही गोंडपिंपरी पोलिसांनी दिला आहे.गोंडपिंपरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांनी रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांबाबत जनजागृतीसाठी अशा प्रकारच्या मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली.







  Print






News - Chandrapur




Related Photos