सीमेवरील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांवर ट्रॅक्टर : तेलंगणा वनविभागाच्या कारवाईविरोधात संताप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील आदिवासीबहुल जिवती तालुक्यातील सगनापूर गावातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांवर तेलंगणा वनविभागाने ट्रॅक्टर चालवून मोठे नुकसान केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या घटनेमुळे सीमाभागातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून पीडित शेतकऱ्यांनी न्यायासाठी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे आणि राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक तथा नगराध्यक्ष अरुण धोटे यांची भेट घेतली.
शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील उभी पिके ट्रॅक्टरच्या साहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आल्याची व्यथा मांडत यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधनच हिरावले गेल्याचा आरोप केला.
या घटनेची गंभीर दखल घेत सुभाष धोटे आणि अरुण धोटे यांनी संबंधित तेलंगणा वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
सीमाभागातील शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच या प्रकरणात संबंधित प्रशासनाने संवेदनशीलता दाखवत शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर तेलंगणातील आशिफाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय होऊन नुकसानग्रस्तांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यावेळी युवक काँग्रेसचे जिवती तालुकाध्यक्ष अमोल कांबळे, माधव डोईफोडे, सिताराम मडावी, तिरुपती पोले, गणेश शेतकर, गजानन वाघमारे, रामेश्वर पोले, अकबर शेख, तसेच गावातील नागरिक हरिचंद्र तुकाराम कुंडगिर, अकबर अब्बासअली शेख, संदीप जाधव, खंडू भिमराव शेळके आणि शेतकरी बालाजी शिवाजी पांढरे, विष्णू नरोटे, मारोती राम शेकडे, मुरलीधर कृष्णाजी पुल्लेवाड, राहुल पांढरे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
News - Chandrapur




Petrol Price




