महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २८ जून रोजी आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २८ जून, २०२६ ला आयोजित करण्यात आलेली आहे, भंडारा जिल्हयात पेपर। करीता १४ पेपर २ करीता २० परीक्षा केंद्राची निवड करण्यात आलेली आहे. पेपर एक करिता ३८४४ परीक्षार्थी व पेपर २ करीता ४९३६ परीक्षार्थी परीक्षा देत आहेत. पेपर एक ची परीक्षा सकाळी १०.३० ते १.०० या वेळात व पेपर २ ची परीक्षा दुपारी १४.३० ते १७.०० या वेळेत होणार आहे.
परीक्षा केंद्राचे नाव -
जे.एम. पटेल कॉलेज भंडारा, नानाजी जोशी विदया. शहापूर, लाल बहादूर शास्री विदया. भंडारा, विनोद विदयालय सिल्ली, जकातदार विदयालय भंडारा, जिल्हा परिषद हाय, व ज्यु कॉलेज वरठी, जिजामाता विद्यालय भंडारा, सन पलंग स्कूल वरठी, चैतन्य विदयालय मानेगाव/ बाजार, महर्षी विदया मंदिर अशोकनगर / भंडारा, जेसीश कॉन्व्हेट भंडारा, नूतन कन्या विदयालय भंडारा, रॉयल पब्लीक स्कूल भंडारा, रेखाबेन मनो. पटेल कॉलज भंडारा, सेंट पिटर्स स्कूल बेला, सेंट मेरीज स्कूल भंडारा, महेंद्र ज्युनियर कॉलेज बेला, बंसीलाल लाहोटी नूतन महा, विदयालय भंडारा, नगर परिषद गांधी विदयालय भंडारा, नवप्रभात हायस्कूल व न्यू कॉलन वरठी येथे होणार आहे.
परीक्षार्थी परीक्षा केंद्रावर येतांना प्रवेशपत्रासोबत आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहनचालक परवाना, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, यापैकी एखादे मूळ ओळखपत्र जवळ असणे आवश्यक आहे. ज्या परीक्षार्थीचे नावात बदल आहे अशा परीक्षार्थीनी राजपत्र, अधिसूचना, विवाह नोंद प्रमाणपत्र, किंवा प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे.
परीक्षा केंद्राच्या प्रवेशाच्या ठिकाणी प्रत्येक परीक्षार्थीची हॅन्ड होल्ड डिटेक्टरच्या सहाय्याने तपासणी केली जाणार आहे. तसेच बायोमेट्रीक घेतली जाणार आहे. प्रत्येक परीक्षार्थीचे Face Recognition केले जाणार आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी १ तास ३० मिनिटे आधी परीक्षा केंद्रात उपस्थित राहावे. प्रत्येक परीक्षा केंद्रात वर्गखोल्या व प्रवेशव्दारावर CCTV लावण्यात आलेले आहेत. पेपर सुरू होण्यापूर्वी २० मिनिटे आधी परीक्षागृहात प्रवेश देण्यात येईल. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही.
परीक्षा केंद्र परिसरात किंवा परीक्षागृहात परीक्षार्थी, पर्यवेक्षक, समवेक्षक, लिपिक, शिपाई यांना मोबाईल वापरण्यास सक्त मनाई आहे. परीक्षार्थीने मोबाईल फोन, कॅलक्युलेटर, कॅमेरा, डिजीटल डायरी किंवा तत्सम प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साधने तसेच वहया, पुस्तके, कोणत्याही प्रकारची कागदपत्रे प्रवेशपत्राशिवाय आणू नयेत. असे साहित्य केंद्रावर किंवा परीक्षागृहात आणण्यास मनाई आहे. परीक्षेसबंधी दिलेल्या सूचनेचा भंग केल्यास तो गैरप्रकार समजण्यात येईल. परीक्षा सुरू झाल्यानंतर ते परोक्षा कालावधी संपेपर्यत परीक्षार्थीस कोणत्याही कारणासाठी परीक्षागृहाबाहेर जाण्यास परवानगी दिली जाणार नाही.
पेपर दोन साठी परीक्षार्थीनी निवडलेला ऐच्छिक विषय ऐनवेळी बदलता येणार नाही. तोतया परीक्षार्थी आढळून आल्यास परीक्षार्थी व तोतया परिक्षार्थी यांचे विरुध्द The Maharashtra Prevention of Malpractices Act १९८२ नुसार कारवाई करण्यात येईल.
सन २०२६ च्या परिक्षेत गैरप्रकारात अथवा इतर कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या परिक्षार्थ्यांना सदर परीक्षा देता येणार नाही. तरीही उमेदवाराने आवेदनपत्र भरुन परीक्षेत प्रविष्ट झाल्याचे निदर्शनास आल्यास कोणत्याही टप्यावर उमेदवारी रद्द करण्यात येईल. नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या आयोजनासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षा आयोजन व सनियंत्रण समिती गठीत करण्यात आली असून सदर समितीत उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींदकुमार साळवे, जिल्हा पोलीस अधिक्षक नूरुल हसन, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था राजेश रुद्रकार, शिक्षणाधिकारी माध्यमिक मनिषा गजभिये, तसेच शिक्षणाधिकारी योजना रवींद्र सोनटक्के यांचा समावेश आहे.
News - Bhandara




Petrol Price




