आजचे दिनविशेष


२ जुलै महत्वाच्या घटना
१६९८ : थॉमस सावेरी यांनी पहिले स्टीम इंजिन चे पेटंट मिळवले.
१८५० : बेंजामिन लेन या शास्त्रज्ञाला गॅस मास्कचे पेटंट मिळाले.
१८६५ : साल्व्हेशन आर्मी या सेवाभावी संस्थेची स्थापना झाली.
१९४० : नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कलकत्ता येथे स्थानबद्ध करण्यात आले.
१९६२ : रॉजर्स, आरकॅन्सास येथे पहिले वॉल मार्ट स्टोअर उघडले.
१९७२ : पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी सिमला करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
१९८३ : कल्पक्कम,तामिळनाडू येथील अणुऊर्जा केंद्र सुरू झाले.
१९९४ : चित्रकार जगदीश स्वामिनाथन यांची मध्य प्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड करण्यात आली.
२००१ : बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे १०४ फूट उंचीचा जगातील मोठा बौध्द स्तूप सापडला.
२००२ : स्टीव फॉसेट हा उष्ण हवेच्या फुग्याद्वारे पृथ्वी प्रदक्षिणा करणारा सर्वप्रथम व्यक्ती झाला.
२०१३ : इंटरनॅशनल एस्ट्रॉनॉमिकल युनियन - प्लूटोच्या चौथ्या आणि पाचव्या चंद्रांना, कर्बेरोस आणि स्टिक्स अशी नावे देण्यात आली.
२००१ : पहिले कृत्रिम हृदय प्रत्यारोपण - एबीओकोर हे स्वयंपूर्ण कृतिर्म हृदय पहिल्यांदा प्रत्यारोपण करण्यात आले.
१९९७ : १९९७चे आशियाई आर्थिक संकट - सुरवात.
१९९० : १९९० ची मक्का दुर्घटना - किमान १४०० मुस्लिम यात्रेकरू मक्का शंकराकडे जाणाऱ्या बोगद्यामध्ये अडकवून त्यांचे गुदमरून निधन.
१९८६ : चिली - देशात जनरल ऑगस्टो पिनोशेच्या हुकूमशाहीच्या विरोधात चालू असणाऱ्या निदर्शनादरम्यान रॉड्रिगो रोजास आणि कारमेन ग्लोरिया क्विंटाना यांना जिवंत जाळण्यात आले.
१९७६ : व्हिएतनाम हा देशात समाजवादी प्रजासत्ताक तयार झाले.
१९६६ : फ्रान्स - देशाने पहिली अण्वस्त्र चाचणी केली.
१९६४ : नागरी हक्क चळवळ, अमेरिका - अध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांनी १९६४ च्या नागरी हक्क कायद्यावर स्वाक्षरी केली.
१९४० : एसएस अरंडोरा स्टार जहाज दुर्घटना - हे जहाज उत्तर अटलांटिकमध्ये बुडाले, त्यात किमान ८०० नागरिकाचे निधन.
१९३७ : अमेलिया इअरहार्ट आणि नेव्हिगेटर फ्रेड नूनन यांचा विषुववृत्तीय जग परिक्रमा करत असताना संपर्क तुटला.
१९२१ : पहिले महायुद्ध - नॉक्स-पोर्टर ठराव: अमेरिका आणि जर्मनी यांच्यातील युद्ध औपचारिकपणे समाप्त.
२ जुलै जन्म
१८६२ : नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ विल्यम हेन्री ब्रॅग यांचा जन्म.
१८७७ : नोबेल पारितोषिक विजेते जर्मन लेखक हेर्मान हेस यांचा जन्म.
१८८० : श्रेष्ठ गायक, नेट गणेश गोविंद बोडस उर्फ गणपतराव बोडस यांचा शेवगाव, अहमदनगर येथे जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर १९६५)
१९०४ : फ्रेंच लॉन टेनिस खेळाडू आणि पोलो टी शर्टचे जनक रेने लॅकॉस्ता यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑक्टोबर १९९६)
१९०६ : नोबल पुरस्कार विजेते अमेरिकन भौतिकीतज्ञ बेटे हान्स आल्ब्रेख्ट यांचा जन्म.
१९२२ : फ्रेन्च फॅशन डिझायनर पिअर कार्डिन यांचा जन्म.
१९२३ : लोकमत चे संस्थापक, संपादक, माजी मंत्री व स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा यांचा जन्म.
१९२५ : काँगोचे पहिले पंतप्रधान पॅट्रिक लुमूंबा यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी १९६१)
१९२६ : विनोदी लेखक वि. आ. तथा विनायक आदिनाथ बुवा यांचा जन्म.
१९३० : अर्जेंटिनाचे ५० वे राष्ट्राध्यक्ष कार्लोस मेनेम यांचा जन्म.
१९५८ : भारतीय अभिनेते पवन मल्होत्रा यांचा जन्म
१९४१ : भारतीय चित्रपट अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचा जन्म (मृत्यू : २२ सप्टेंबर २०२०)
१९३० : भारतीय लेखक आणि चित्रकार ओ. व्ही. विजयन यांचा जन्म (मृत्यू : ३० मार्च २००५)
१९१८ : भारतीय राजकारणी, खासदार इंदुमती भट्टाचार्य यांचा जन्म (मृत्यू : २० एप्रिल १९९०)
१८७७ : जर्मन-जन्म स्विस कवी, कादंबरीकार आणि चित्रकार - नोबेल पुरस्कार विजेते हरमन हेसे यांचा जन्म (मृत्यू : ९ ऑगस्ट १९६२)
२ जुलै मृत्यू
१५६६ : जगप्रसिद्ध फ्रेंच भविष्यवेत्ता नाॅस्टाॅडॅमस यांचे निधन. (जन्म: १४ डिसेंबर १५०३)
१७७८ : फ्रेंच विचारवंत, लेखक आणि संगीतकार रुसो यांचे निधन. (जन्म: २८ जून १७१२)
१८४३ : होमिओपाथी या वैद्यकीय उपचारपद्धतीचे जनक डॉ. सॅम्यूअल हानेमान याचं निधन. (जन्म: १० एप्रिल १७५५)
१९५० : समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक युसूफ मेहेर अली यांचे निधन. (जन्म: २३ सप्टेंबर १९०३)
१९६१ : नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखकअर्नेस्ट हेमिंग्वे यांचे निधन. (जन्म: २१ जुलै १८९९)
१९९९ : अमेरिकन लेखक मारिओ पुझो यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर १९२०)
२००७ : क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९४०)
२०११ : कम्युनिस्ट नेते चतुरनन मिश्रा यांचे निधन. (जन्म: ७ एप्रिल १९२५)
२०१३ : कॉम्पुटर माउस चे शोधक डगलस एंगलबर्ट यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी १९२५)
२०१८ : भारताचे १४वे नौसेनाप्रमुख - परम विशिष्ट सेवा पदक ऍडमिरल जयंत नाडकर्णी यांचे निधन (जन्म: ५ डिसेंबर १९३१)c
२०१६ : भारताचे १४वे नौसेनाप्रमुख - परम विशिष्ट सेवा पदक ऍडमिरल जयंत नाडकर्णी यांचे निधन (जन्म: ५ डिसेंबर १९३१)c
२०१६ : फ्रान्स देशाचे १६०वे पंतप्रधान, फ्रेंच नागरी सेवक आणि राजकारणी मिशेल रोकार्ड यांचे निधन (जन्म: २३ ऑगस्ट १९३०)
News - todayspecialdays




Petrol Price




