महत्वाच्या बातम्या

 रत्नापूर जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत २१ जून २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये योगाचे महत्त्व रुजावे आणि आरोग्यदायी जीवनशैलीची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने योगासन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हा कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक दिनकर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश्वर लोधे उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संदीप डोंगरवार यांची उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमास माजी अध्यक्ष तंटामुक्त समितीचे बालाजी लेंजे, तसेच शिक्षक वर्गातील प्रदीप बद्देलवार, नंदू बोरकर, विकास राजुरकर, रोशन रावणे, वैशाली कोवले, चाचेरकर सर, अंशकालीन निदेशक अंकुश गजबे, मंगेश बन्सोड, शितल कापगते, सचिन ढोणे, इंदिरा मडावी, पुष्पा गळमळे, प्रतिभा शेंद्रे, नंदा परचाके, नंदा आत्राम, माधुरी तोंडफोडे, सुशीता सलामे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक वर्ग आणि इयत्ता १ ली ते १० वीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शकांनी योगाचे महत्त्व स्पष्ट करत विविध योगासने व प्राणायामांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यामुळे उपस्थित विद्यार्थी व पालकांना योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी असलेले फायदे समजून घेण्यास मदत झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास राजुरकर यांनी केले, तर संचालन अंकुश गजबे यांनी केले. शेवटी मुख्याध्यापक दिनकर गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले.

सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. योग दिनानिमित्त शाळेत निर्माण झालेल्या उत्साही वातावरणामुळे संपूर्ण परिसरात सकारात्मक ऊर्जा जाणवली.





  Print






News - Chandrapur




Related Photos