अतिदुर्गम भामरागड नगरपंचायतला ‘ओडीएफ प्लस‘ चा दर्जा प्राप्त


- स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत विविध उपक्रमांची सुरूवात

विदर्भ न्यूज एक्स्प्रेस 
प्रतिनिधी / भामरागड 
: नुकत्याच पार पडलेल्या मुल्यांकनानूसार भामरागड शहरास 'ओडीएफ प्लस'चा दर्जा प्राप्त झालेला असुन निश्चितस नगरपंचायतीकरीता अभिमानाची बाब आहे. 
तसेच ‘इको - फ्रेंडली' उपक्रमाअंतर्गत नगरपंचायत भामरागड तर्फे पर्यावरण पुरक ‘बांम्बू बिंस‘ २५ पेक्षा अधिक ठिकाणी लावण्यात आलेले आहे. सदर पर्यावरण पुरक बांम्बू बिंस नगरपंचायत क्षेत्रातील कोयनगुडा येथील स्थानिक कारागीरांकडून बनवून घेतले असल्याने स्थानिकांना रोजगार प्राप्त झाला आहे. 
स्वच्छ भारत अभियानांअंतर्गत सामाजिक संदेश देणारी पेंटींग शहराच्या विविध दर्शनी भागात रेखाटण्यात आलेली असून काही ठिकाणी स्थानिक भाषेचा म्हणजेच गोंडी आणि माडिया वापर करण्यात आलेला असुन हे काम सुध्दा नगरपंचायत क्षेत्रातील कोयनगुडा येथील कलांकारांकडून करण्यात येत असल्यामुळे स्थानिकांना रोजगार प्राप्त होत आहे.
कचरा मुक्त शहराअंतर्गत १५ ते २० ठिकाणी १२० लिटर क्षमतेचे लिटर बिन्स (स्टीलच्या कचरा कुंडया) बसविण्यात येत आहे. तसेच सर्व नागरीकांना आवाहन करण्यात आले की, ओला व सुका कचरा असा विलगीकृत स्वरूपातील कचरा या बिन्स मध्ये टाकून शहर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन मूुख्याधिकारी, नगरपंचायत भामरागड यांनी केले आहे. 
शहरात घंटागाडी मार्फत कचरा संकलनाचे काम चालू असून घंटागाडी तर्फे सुध्दा जनजागृतीचे काम सुरू आहे. नगरपंचायतच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या शेडचे बांधकाम सुरू झालेले असून लवकरच प्रकल्प शहराच्या सेवेत कार्यरत होणार आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2021-03-24


Related Photos