मांढळ–पवनी मार्गावर टिप्पर धडक : आजोबा व नातू जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : मांढळ–पवनी मार्गावर भरधाव टिप्परने दुचाकीला समोरासमोर धडक दिल्याने झालेल्या अपघातात आजोबा व नातू जखमी झाले आहेत. ही घटना १५ जून रोजी सकाळी सुमारे ६:४५ वाजताच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम कमलाकर प्रधान (१९, रा. विरली खुर्द) आणि सोमाजी राऊत (वय ७०, रा. मांढळ) हे दोघे दुचाकी क्रमांक एमएच ३६ एई ०१८५ ने मांढळकडे जात असताना विरुद्ध दिशेने वेगात येणाऱ्या टिप्परने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेमध्ये दोघेही रस्त्यावर कोसळून जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली व जखमींना उपचारासाठी हलविण्यात आले.
अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे.
News - Bhandara




Petrol Price




