मुरखळा माल येथे देशी दारू जप्त : आरोपी ताब्यात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील मुरखळा माल येथे अवैध देशी दारू विक्रीवर पोलिसांनी कारवाई करत मोठा छापा टाकला. १५ तारखेला करण्यात आलेल्या या कारवाईत दारू विक्रेत्याच्या घराची झडती घेऊन मुद्देमाल जप्त करण्यात आला.
झडतीदरम्यान सुमारे १२ हजार रुपये किमतीची देशी दारू आढळून आली. ही दारू अवैधरीत्या साठवून विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी आरोपी चंद्रशेखर शामराव सोमनकर ( ३२, रा. मुरखळा माल) याच्याविरुद्ध सहायक पोलिस निरीक्षक सुमेध बनसोडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
पुढील तपास हवालदार श्यामल पौळ करीत आहेत. या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाल्याचे चित्र आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




