महत्वाच्या बातम्या

 वडार झोपडपट्टीत जुगार अड्ड्यावर छापा : ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : शहरातील वडार झोपडपट्टी परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धडक कारवाई करत छापा टाकला. या कारवाईत ६७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दादाराव मुळे यांच्या घरी जुगाराचा अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित ठिकाणी छापा टाकला.

छाप्यादरम्यान रूपेश प्रभाकर कळने, राजेश मुलायमसिंग चंदेल, दादाराम मुळे आणि बाबाराव मुळे हे चौघे जुगार खेळताना आढळून आले.

पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून घटनास्थळावरून रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण ६७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.





  Print






News - Wardha




Related Photos