महत्वाच्या बातम्या

 वैनगंगा नदीपात्रात रेती चोरी : ट्रॅक्टर टाकून आरोपी फरार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : खमाटा/टाकळी येथील वैनगंगा नदीपात्रात अवैध रेती उत्खननाचा प्रकार पोलिसांच्या पेट्रोलिंगदरम्यान उघडकीस आला. ही कारवाई १२ जून रोजी सकाळी सुमारे ६.४० वाजता पोलिस हवालदार बर्वे आणि त्यांच्या पथकाने केली.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर व ट्रॉलीमध्ये अंदाजे १ ब्रास (सुमारे ६ हजार रुपये किमतीची) रेती भरून वाहतूक करत असल्याचे आढळले. पोलिस स्टाफला पाहताच आरोपीने कारवाई टाळण्यासाठी व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने ट्रॅक्टर-ट्रॉलीतील रेती पुन्हा नदीपात्रात खाली केली आणि घटनास्थळावरून ट्रॅक्टरसह पळ काढला.

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी वरठी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरू असून पुढील तपास सुरू आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos