नवरगाव बॅंक आफ इंडीया कडुन महिला स्वयंसहाय्यता समूहाचा सत्कार

विदर्भ न्युज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : नवरगाव परीसरातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व वेळेवर कर्ज परतफेड करणारे गट, स्वयंसहाय्यता समुहांची बॅंक आफ इंडीया शाखा नवरगाव कडून दखल घेऊन त्याना प्रमाणपञ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी यशस्वी महिला स्वयंसहाय्यता समूह रत्नापूर, रुखमाई महिला स्वयंसहाय्यता समूह पेंढरी, राधीका स्वयंसहाय्यता समुह अंतरगाव, तुलसी महिला स्वयंसहाय्यता समुह देलनवाडी, यशोधरा स्वयंसहाय्यता समुह मिनघरी, राणी हिराई स्वयंसहाय्यता समुह रत्नापूर हेटी, श्री गणेशा स्वयंसहाय्यता समुह नांदगांव, अधीरा स्वयंसहाय्यता समुह नवरगाव आदी समुहानी विविध व्यवसाय करुन आर्थिक उन्नतीस हातभार लावला व त्यासोबतच बॅंक आफ इंडीया शाखा नवरगाव येथुन कर्ज घेऊन नियमीत परतफेड केल्याने जिल्हा व्यवस्थापक प्रविण भांडारवार, तालुका व्यवस्थापक स्नेहल मडावी, नवरगाव शाखेचे व्यवस्थापक प्रकाशचंद पांडा, आदीत्य खोब्रागडे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत बचत गट, स्वयंसहाय्यता समुहांना प्रोत्साहीत करण्यासाठी त्यांना शाखा कार्यालयात मान्यवारांच्या हस्ते प्रमाणपञ देऊन सन्मानित करण्यात आले.
शिवाय बॅंक सखी प्रियंका कामडी यांनी महीला गटांसाठी उत्कृष्ट काम केल्याने त्यांचाही भेट वस्तु व प्रमाणपञ देऊन मान्यवरांकडुन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार मात्रुभुषण मोटघरे यांनी मानले. यावेळी बॅंकेतील अधीकारी, कर्मचारी, बचत गट, स्वयंसहाय्यता समुहातील पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News - Chandrapur




Petrol Price




