महत्वाच्या बातम्या

 सिरोंचा शहराच्या समस्या सोडविण्यासाठी नगरसेवक रंजित गागापूरवार यांचे निवेदन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा : नगरपंचायत सिरोंचा येथे नवनियुक्त मुख्याधिकारी म्हणून पदभार स्वीकारलेल्या राजू सिडाम (नायब तहसीलदार) यांचे नगरसेवक रंजित नागेश्वर गागापूरवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी नगरसेवक रंजित गागापूरवार यांनी सिरोंचा शहरातील विविध नागरी समस्यांबाबत मुख्याधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन सादर केले. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नाल्यांची स्वच्छता, बंद असलेले पथदिवे व हायमास्ट लाईट सुरू करणे, डास नियंत्रणासाठी फोगिंग, ब्लिचिंग पावडरची फवारणी तसेच मान्सूनपूर्व आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी करण्यात आली.

तसेच सध्या आंदोलन करीत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित व न्याय्य मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन शहरातील स्वच्छता व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली. यावेळी राजू सिडाम यांनी शहराच्या विकासासाठी व नागरिकांच्या समस्यांच्या निराकरणासाठी प्रशासनामार्फत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

या प्रसंगी रंजित गागापूरवार यांच्यासह नगरसेवक इम्तियाज खान युवक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos