महत्वाच्या बातम्या

 मोहर्लीत वी केअर फाउंडेशनचे श्रमदान : आगरझरी गेट परिसर झाला स्वच्छ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : सामाजिक बांधिलकी जपत वी केअर फाउंडेशनच्या वतीने मोहर्ली येथील आगरझरी गेट परिसरात बुधवारी (२० मे) व्यापक स्वच्छता अभियान राबविण्यात आले. परिसरातील रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा हटवून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने आयोजित या अभियानात गावकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. स्वच्छता मोहिमेदरम्यान नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, पर्यावरणाचे संवर्धन करणे तसेच स्वच्छतेची सवय अंगीकारण्याचे आवाहन करण्यात आले.

या उपक्रमाला वन विभागाचे क्षेत्रीय वन अधिकारी (आरएफओ) संतोष थीपे यांचेही सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष हिमायूं अली यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या अभियानात शहबाज शेख, हाजी अली, अर्पण कोठारे, यशराज बगीहेले, महेश गोरे, सिद्धार्थ शेगांवकर, इसरार शेख, अभिजित लिखितकर तसेच आझाद भाई यांनी सक्रिय सहभाग नोंदवून परिसर स्वच्छ करण्यासाठी श्रमदान केले.

प्रकृती सुरक्षित तर भविष्य सुरक्षित हा संदेश देत वी केअर फाउंडेशनकडून आगामी काळातही पर्यावरण संरक्षण, स्वच्छता आणि सामाजिक जनजागृतीशी संबंधित विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.

या स्वच्छता अभियानामुळे परिसरात स्वच्छतेबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनीही सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos